Download App

Jalna Maratha Protest : मराठा आंदोलनात झालेली दगडफेक भिडेंच्या सांगण्यावरून? समन्वयकांचा आरोप

  • Written By: Last Updated:

Jalna Maratha Protest : जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं परिस्थिती चिघळली आहे. या लाठीचार्जमध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याने राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला जातोय. विरोधक आणि मराठा समाज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) या लाठीचार्ज प्रकरणी जबाबदार धरत आहेत. दरम्यान, आता मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक संजय लाखे पाटील (Sanjay Lakhe Patil) यांनी या हिंसाचारावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संभाजी भिडे यांच्या संघटनेवर गंभीर आरोप केले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=TWoD7CRKg80

शुक्रवारी झालेल्या लाठीचार्जच्या घटनेमुळं पोलिसांविरोधा संताव्य व्यक्त केला जात आहे. या घटनेत अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले. पोलीसांवर कारवाईची मागणी होऊ लागली. मात्र, आंदोलकांनी आधी पोलिसांवर दगडफेक केल्यानं लाठीचार्ज करावा लागल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येते आहे. त्यानंतर आता मराठा आंदोलन भडकवणारे हे संभाजी भिडेंचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. आज जालन्यात मराठा समन्वयकांची बैठक झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला.

गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, बेवारस सापडलेल्या वडिलांची मृत्यूशी झुंज अपयशी ! 

आज पत्रकार परिषदेत बोलतांना लाखे यांनी सांगितले की, आतापर्यंत मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले आहेत. कधीही धुडगूस घातला नाही. पण मराठा समाजाला बदनाम कऱण्यसाठी संभाजी भिडे यांचे कार्यकर्त्यांनी आंदोलनात घुसून उद्रेक केला, असा त्यांनी केला. तसेच लाठीमाराचे आदेश कोणी दिले याची चौकशी व्हावी व देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी लाखे पाटील यांनी केली.

दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे. मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत आणि गुन्हे मागे न घेतल्यास हजारो मराठा आंदोलक शासन आपल्या दारी या कार्यक्रमात उपोषण करतील, असा इशाराही मराठा लाखे पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी एका महिन्यात मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका बोलून दाखवली.

अमानुष लाठीचार्जनंतर आता आंदोलनाने हिंसक रूप धारण केले आहे. त्यामुळे आजपासून ते 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जालना जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

Tags

follow us