गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, बेवारस सापडलेल्या वडिलांची मृत्यूशी झुंज अपयशी !

  • Written By: Published:
गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, बेवारस सापडलेल्या वडिलांची मृत्यूशी झुंज अपयशी !

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गौतमीचे वडिल रवींद्र बाबुराव पाटील (Ravindra Patil) यांचे खासगी रुग्णालयात सोमवारी निधन झाले. गौतमीचे वडिल हे तीन दिवसांपूर्वी धुळ्यात बेवारस स्थितीत आढळून आले होते. धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. बेवारस व्यक्ती ही गौतमी पाटील हिचे वडिल असल्याचे समोर आले होते. ही माहिती मिळाल्यानंतर गौतमी हिने नातेवाइकांच्या मदतीने वडिलांना उपचारासाठी पुण्यात नेले होते. तेथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे.

Jalna Maratha Protest : ‘एक फुल अन् दोन हाप तुम्ही राजीनामा द्या’; उद्धव ठाकरेंची मागणी

तीन दिवसांपूर्वी धुळ्यातील रस्त्यावर एक व्यक्ती बेवारस स्थितीत आढळून आली होती. नागरिकांना याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांना याबाबत माहिती दिली होती. सामाजिक कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला उपचारासाठी धुळ्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. या व्यक्तीकडे असलेल्या ओळखपत्रावर त्याचे नावही उघडकीस आले होते. ही व्यक्ती गौतमी पाटील हिचे वडिल असल्याचे पुढे समोर आले. गौतमी पाटील हिने वडिलांची काही विचारपूस केली नाही, साधा संपर्कही साधला नाही, अशी सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर केले होते.

Wadhawan Brothers : तुरुंगातील पंचतारांकित अय्याशी भोवली; वाधवान बंधूंची ताटातूट

त्यानंतर गौतमी पाटील हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यावर माझे वडिल हे गंभीर अवस्थेत आढळले. त्याबाबत मला काहीच कल्पना नव्हते. ते बेवारस स्थितीत आढळल्याच्या बातम्यांमधून मला कळाले असे सांगितले. त्यानंतर गौतमी हिने तिच्या मावशीला सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. त्यानंतर धुळ्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर रवींद्र पाटील यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्यामुळे ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. आज उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.

गौतमी पाटील हिचे वडिल हे दारूच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांनी गौतमी व तिच्या आईला सोडून दिले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube