ज्योती क्रांती मल्टीस्टेटवर दरोडा: पिस्तुल, चाकूचा धाख दाखवून लाखोंचे दागिने, रोकड लुटली

Jyoti Kranti Bank robbery : धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट पतसंस्थेवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास शसस्त्रा दरोडा पडला. यात दरोडेखोरांनी पिस्टल, चाकूचा धाक दाखवून बँक लूटली. पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना डांबून लाखोंचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चौघेजण कैद झाले. धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी क्रिडा […]

Jyoti Kranti Bank Robbery

Jyoti Kranti Bank Robbery

Jyoti Kranti Bank robbery : धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट पतसंस्थेवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास शसस्त्रा दरोडा पडला. यात दरोडेखोरांनी पिस्टल, चाकूचा धाक दाखवून बँक लूटली. पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना डांबून लाखोंचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चौघेजण कैद झाले.

धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी क्रिडा संकुलाजवळच ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. ही पतसंस्था आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास या पतसंस्थेतील कर्मचारी काम करीत असतानाच अज्ञात पाच व्यक्ती घुसले होते. त्यांनी आपल्याकडील पिस्टल तसेच चाकूचा धाक दाखवित कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले होते. यानंतर काही क्षणातच आतील लाखोंचे सोने आणि रोकड घेऊन ते पसार झाले. यातील चौघे दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

दाऊद इब्राहिमला मोठा दणका; मुंबई आणि रत्नागिरीतील मालमत्तांचा होणार लिलाव

या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षण गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. वासुदेव मोरे, आनंदनगर ठाण्याचे पो नि बांगर घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर डॉग स्कॉड आणि ठसे तज्ञांच्या टीमने घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला आहे.

Exit mobile version