दाऊद इब्राहिमला मोठा दणका; मुंबई आणि रत्नागिरीतील मालमत्तांचा होणार लिलाव

दाऊद इब्राहिमला मोठा दणका; मुंबई आणि रत्नागिरीतील मालमत्तांचा होणार लिलाव

Dawood Ibrahim : काही दिवसांपूर्वी दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) पाकिस्तानमध्ये विषबाधा झाल्याच्या अफवेमुळे चर्चेत आला होता. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं असलं, तरी त्याच्यावर तपास यंत्रणांची कारवाई सुरूच आहे. स्मगलिंग अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेशन अॅक्ट (SAFEMA) अंतर्गत त्याच्या रत्नागिरीतील अनेक मालमत्तांचा 5 जानेवारी रोजी लिलाव होणार आहे.

केंद्र सरकारने यासंदर्भात वर्तमानपत्रात जाहिरातही दिली आहे. हा लिलाव दुपारी 2 ते 3.30 या वेळेत होणार आहे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात काही वर्षांपूर्वी बंगले आणि आंब्याच्या बागांसह एकूण चार मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. पुढील महिन्यात त्यांचा लिलाव होणार आहे.

दाऊदच्या 11 मालमत्तेचा पहिल्यांदा 2000 साली आयकर विभागाने लिलाव केला होता, मात्र त्यानंतर कोणीही लिलाव प्रक्रियेत आले नव्हते. मात्र गेल्या काही वर्षांत दाऊदच्या अनेक मालमत्ता विकण्यात आणि खरेदीदारांना ताबा मिळवून देण्यात तपास यंत्रणांना यश आले.

हॉटेल 2018 मध्ये विकले गेले
2018 मध्ये नागपाडा येथील एक हॉटेल, एक गेस्ट हाऊस आणि दाऊदची एक इमारत विकण्यात आली होती. त्याचवेळी दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या दक्षिण मुंबईतील फ्लॅटचा लिलाव करण्यातही तपास यंत्रणेला यश आले होते.

काँग्रेसमध्ये फेरबदल; तेलंगणामध्ये विजय मिळवून देणाऱ्या प्रभारीकडे महाराष्ट्राची जबाबदारी

दाऊदच्या पेट्रोल पंपाचाही लिलाव झाला
नागपाडा येथील 600 स्क्वेअर फूट डी कंपनीच्या फ्लॅटचा एप्रिल 2019 मध्ये 1.80 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला. 2018 मध्ये, SAFEMA अधिकाऱ्यांनी पाकमोडिया स्ट्रीटमधील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव केला होता. जी ट्रस्टने 3.51 कोटी रुपयांना विकत घेतली होती. डिसेंबर 2020 मध्ये, दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाच्या 1.10 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा रत्नागिरीत लिलाव करण्यात आला. यामध्ये दोन भूखंड आणि बंद पेट्रोल पंपाचा समावेश होता. दाऊदची बहीण हसिना पारकर (Hasina Parkar) हिच्या नावावर खेड तालुक्यातील लोटे गावात या मालमत्तांची नोंद करण्यात आली होती. हसीनाचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

फेरबदलाची सुरुवात गांधी घराण्यातून, प्रियांकाला यूपीतून हटवले; कोण कुठे प्रभारी आहे जाणून घ्या…

डी कंपनीकडून धमक्या आल्या
यापूर्वी लिलाव करण्यात आलेल्या दाऊदच्या मालमत्तेत एक रेस्टॉरंट 4.53 कोटी रुपयांना विकले गेले, सहा फ्लॅट 3.53 कोटी रुपयांना आणि गेस्ट हाऊस 3.52 कोटी रुपयांना विकले गेले होते. यापूर्वी दाऊदच्या मालमत्ता विकत घेतलेल्या काही लोकांना डी कंपनीकडून धमक्याही आल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube