Hunger Strike Ashti : सध्या राज्यात कोणत्या जिल्हा चर्चेत असेल तो एकमेव जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. या जिल्ह्यात चळवळी, संघटना, राजकीय संघर्ष आणि सामाजिक विषय अशा सर्वांचीच घुसळण सुरू असते. (Hunger Strike) बीड जिल्ह्यात सर्व विषय सुरू असतानाच आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिऱ्हे हे गावातील राम मंदिरात अमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांचा आजचा सहावा दिवस आहे. संबंधीत तहसीलदारांनी त्यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, गिऱ्हे हे आपल्या मागण्यांवर ठाम असून त्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माघार नाही, अशी त्यांनी सध्यातरी भूमिका घेतली आहे.
निमगाव चोभा येथे महाराष्ट्र राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करण्यात यावी यासाठी आणि गावठाण व शिव रस्ते सर्वे नंबर हे सरकारने रोड बजेट टाकून तयार करण्यात यावेत यासाठी गिऱ्हे हे आंदोलनाला बसले आहेत. तहसीलदार मॅडमने भेट घेतली असून हा मुद्दा वरिष्ठ पातळीवरील आहे. तो आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचू. तुम्ही उपोषण मागं घ्यावं अशी मागणी केली आहे. मात्र, गिऱ्हे हे त्यासाठी तयार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
सगे- सोयऱ्यांचा निर्णय कधीपर्यंत लागू होणार?, मनोज जरांगे पाटलांनी थेट तारीखच सांगितली
तलाठी, तहसिलदार या सर्वांनी चर्चा केली आहे. मात्र, गिऱ्हे यांचं मत आहे की आता माझा जीव गेला तरी बेहत्तर पण मी माघार घेणार नाही अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली आहे. या अगोदरही कांतिलाल गिऱ्हे यांनी आंदोलन केलं आहे. त्यावेळीही त्यांची तब्येत टोकाची खालावल्यानंतर त्यांनी उपोषण मागं घेतलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे युव प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी उपोषण सोडवण्यात पुढाकार घेतला होता.
कांतीलाल गिऱ्हे हे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखेच गेली अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात सक्रीय असतात. अनेक सामाजिक मुद्यांवर ते आंदोल करत आले आहेत. त्यांनाही आंदोलनाचा मोठा अनुभव असल्याने ते गेली सहा दिवसांपासून अन्नापाण्याशिवाय उपोषण करत आहेत. आता येत्या काळात आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस, माजी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भिमराव धोंडे यांच्यापैकी कोण दखल घेतं हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.