लेखी आश्वासनानंतर कांतीलाल गिऱ्हेंचं १५ दिवसांनी आंदोलन स्थगित; आजी-माजी आमदार का फिरकले नाहीत?

लेखी आश्वासनानंतर कांतीलाल गिऱ्हेंचं १५ दिवसांनी आंदोलन स्थगित; आजी-माजी आमदार का फिरकले नाहीत?

Hunger Strike Ashti : राज्यात सध्या बीड जिल्ह्यातील अनेक क्रृर घटना आणि इतर ठिकाणी सुरू असलेला औरंगजेब कबरेचा विषय मोठा तापला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष सरकारी (Ashti) दरबारी काहीतरी कमी व्हावा म्हणून बीडच्या आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिऱ्हे यांनी गेली १५ दिवसांपासून आमरण उपोषण केलं. परंतु, तालुक्यात एक आजी तर दोन माजी आमदार असताना त्यांना कुणालाही इकड डुंकूनही पाहाव वाटलं नाही ही खेदाची बाब आहे.

आमदारांचं दुर्लक्ष

कांतीलाल गिऱ्हे हे महाराष्ट्र राज्यातील जमिनीची पुनर्मोजणीच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. दरम्यान, प्रशासकीय पातळीवर फक्त काही अधिकारी त्यांना भेटत होते. काल त्यांनी आष्टी तालुका प्रमथ मोजणीसाठी जमाबंदी आयुक्त यांच्याकडे भुमी अभिलेख अधिक्षक बीड यांच्या विनंतीला मंजुरी निर्देश मिळाला. आष्टी तालुका जमीन पोटहिसा मोजणी पुर्ण करू असे भुमी अभिलेख अधिक्षकांनी आश्वासन दिलं. त्यानंतर गिऱ्हे यांनी आपलं १५ दिवस चाललेलं उपोषण स्थगित केलं. मात्र, प्रश्न पडतो राज्यभर चर्चेत असलेले आमदार सुरेश धस, माजी आमदार भिमराव धोंडे आणि नुकतेच विधानसभेला पराभूत झालेले बाळासाहे आजबे यांच्यापैकी कुणी मतदारसंघात आंदोलन चालू असतानाही त्यांच्याकडं का गेले नाहीत?

आता जीव गेला तरी उठणार नाही; सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिऱ्हेंच आमरण उपोषण, मागण्या काय?

गिऱ्हे हे गावातील राम मंदिरात अमरण उपोषणाला बसले होते. त्यांनी पाणीही घेणार नाही असा निश्चय केला होता. मात्र, तब्येत साथ देईल का नाही असा प्रश्न असल्याने कधीतरी पाणी घेतलं तरी अन्न मात्र त्यांनी घेण्यास नकार दिला. त्यामुळे आपल्याच भागातील एखादा व्यक्ती आंदोलनाला बसला आसताना लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार धस यांनी त्यांची भेट घ्याला पाहिजे होती. परंतु, तस काही घडलं नाही. कदाचीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मेहबुब शेख गिऱ्हे यांना भेटून गेल्याने बाकी आजी-माजी आमदार आले नसावेत. कारण आपल्या विचारांचा आणि आपला कार्यकर्ता आहे का याची चौकशी करूनच हे लोक आंदोलनाकडंही पाहत असावेत अशी निमगाव चोभा येथील नागरिकांची भावना आहे.

…तर पुन्हा आंदोलन

यावेळी कांतीलाल गिऱ्हे यांना आष्टी तालुका जमीन पोटहिसा मोजणी पुर्ण करू असे भुमी अभिलेख अधिक्षकांकडून आश्वासन मिळालं आहे. त्यांच्याकडून तोंडी आश्वासन मिळत होतं. मात्र, तसं आश्वासन नको, तुम्ही लेखी द्या अशी मागणी गिऱ्हे यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांना लेखी आश्वासन मिळाल्यावर गिऱ्हे यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. आता गिऱ्हे यांच्या मागणीप्रमाणे मोजणी होते का हे पाहणं महत्वाचं ठरणारं आहे. अन्यथा पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन केलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube