Karuna Munde On Politics : शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे (Karuna Munde)यांनी आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट (secret explosion)करणार असल्याचे सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, चार दिवसात राजकीय गौप्यस्फोट करणार आहेत. सध्या महाराष्ट्रात (Maharashtra)बाजार समितीच्या निवडणुका (Bazar samiti Election) लागलेल्या आहेत. त्या निवडणुकीत अतिशय घाणेरडा प्रकार चालू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
36 दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात
करुणा मुंडे म्हणाल्या की, सध्या राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन टीका सुरु आहे. याचा लवकरच भांडाफोड करणार आहे. माझ्याकडे दोन दिवसांमध्ये एक व्हिडिओ येणार आहे आणि तो व्हिडिओ माझ्याकडे आल्यानंतर त्याचा भांडाफोड केला जाणार आहे.
महाराष्ट्रात राजकारणामध्ये जो घाणेरडापणा चालू आहे, तो घराणेशाहीचा आहे आणि ही घराणेशाही जी आहे, ती लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करुणा मुंडेंनी केली आहे.
या लोकांनी लोकशाही संपवून टाकलेली आहे. त्यामुळे मी स्वतः पक्ष काढलेला आहे. आणि मी राजकारणात कधीही घराणेशाही आणणार नाही. माझा एकच मुलगा आहे, आणि मी त्याला आज, उद्या कधीही राजकारणात आणणार नाही. त्यामुळे मी घराणेशाही मोडण्याची सुरुवात स्वतःपासून करत आहे. या राजकारणामध्ये माझा मुलगा नाही, मी माझ्या मुलाला यापासून दूर ठेवलेलं आहे. प्रतिक्रिया त्यांनी दिली.