आम्हाला सप्ताहाचा हिशोब विचारतो, तुझा संतोष देशमुख (Santosh Deshmukh) करून टाकू’ असं म्हणत बीडच्या गेवराई शहराजवळ एका कीर्तनकार महाराजाला गावगुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. बीडमधील गुंडाराज अजूनही कायम आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारल्याच्या कारणावरून गेवराई शहराजवळ पाच ते सात गावगुंडांनी किर्तनकार कैलास राजेंद्र आनंदे महाराज यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.
गावगुंडांनी महाराजांना लोखंडी रॉड, केबल वायर, कोयता, चाकू, शॉकअप, लाकडी दांडक्यांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. काल सकाळी १० ते १०.१५ वाजता गेवराई शहरात जातेगाव रोडवर गावगुंडांनी किर्तनकार महाराज कैलास आनंदे यांना वाटेत गाठलं आणि त्यांना अमानुष मारहाण केली.मारहाणीत महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांना बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कैलास आनंदे महाराज हे स्वानंद सेवा हे गुरूकूल चालवतात. कैलास आनंदे महाराज यांनी जोग महाराज वारकरी संस्था आळंदी येथुन वारकरी सांप्रदयाचे शिक्षण घेऊन ग्रामीन भगात वारकरी शिक्षण देण्याचं कार्य करीत आहेत. या मारहाणीनंतर किर्तनकार महाराजांच्या वडिलांनी माध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे. गावात आमचं एकटंच घर आहे. त्या लोकांची दहशत आहे. आम्हाला गावात राहणं देखील अवघड झालं असं ते म्हणाले.
या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करावी, अन्यथा आमचे गावात राहणे देखील कठीण होईल असं सांगताना किर्तनकार कैलास आनंद यांची वडील राजेंद्र आनंदे यांना रडू कोसळलं. गावातील गावगुंडांनी शासकीय दूध डेअरी जवळ अडवलं. त्यानंतर त्यांनी माझ्यावर हल्ला चढवला. आम्हाला सप्ताहाचा हिशोब विचारतो का असं म्हणत मला मारहाण केली.गुप्ती, रॉड , केबल, कोयते, कुऱ्हाडीने मारहाण केली.
जर आता परत आम्हाला हिशोब विचारला तर तुझा आम्ही संतोष देशमुख करू अशी धमकीही गावगुंडांनी दिली, अशी माहिती किर्तनकार कैलास राजेंद्र आनंदे यांनी दिली. दरम्यान बीडमधील गुंडाराज अजूनही कायम आहे. गावगुंडांनी जिल्ह्यात धुडगूस घातला आहे. दररोज हाणामारीच्या घटना होत असल्याचे वृत्त वाचण्यात येत असून तेथील कायदा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
— Vrushal Karmarkar (@vrushalk98) May 14, 2026
