Video : हरिनामाचा जप करा म्हणजे चांगलं काम….; भाजप नेत्यानं इतिहास काढत पवारांना खोचक सल्ला
Gopichand Padalkar Attack On Sharad Pawar : सत्ता असताना शरद पवार यांनी महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं, असं म्हणत भाजप नेते गोपीचंद पडकर यांनी पवारांनी आता निवांत राहून हरिनामाचा जप करावा म्हणजे तुमच्या डोक्यात पुण्य काम करण्याची इच्छा निर्माण होईल असा खोचक टोला आणि सल्ला दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी पवारांमुळं हरवली, असेही पडळकर म्हणाले आहेत.
पवारांमुळे पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला
पवारांमुळे पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला असे म्हणत महाराष्ट्राचा चेहरा सुधारण्याची आणि बदलण्याची आवश्यकता होती, ती देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केल्याचे पडळकर म्हणाले. जवळपास 50 ते 60 वर्ष शरद पवार यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता होती. मात्र, त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटण्याचं काम केलं.
पवार आणि सुळे प्रायव्हेट कंपनी
छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षीत असणारा महाराष्ट्र जो 18 पगड जातींचा आणि 12 बलुतेदारांचा तो 50 वर्ष पवारांनी स्वत:ची प्रायव्हेट कंपनी म्हणून वापरल. आधी फक्त पवार प्रायव्हेट कंपनी होती आता पवार आणि सुळे प्रायव्हेट कंपनी झाली आहे असेही पडळकर म्हणाले.
हरीनामाचा जप करा म्हणजे चांगले काम करण्याची इच्छा होईल
जातीजातीमध्ये वाद लावायचा, महाराष्ट्रात वातावरण अशांत ठेवायचं आण प्रस्थापितांची घरे भरण्याचे काम पवारांनी केले आहे. पवारांचा जो शासनकाळ होता तो काळाकुट्ट होता. शरद पवारांनी भ्रष्टाचार, जातीवाद केला. लोकांमध्ये भांडण लावली. आता मला त्यांनी विनंती करायची आहे की, निवांत राहा, हरीनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये चांगले काम करण्याची इच्छा जागृत होईल असा खोचक सल्ला पडळकरांनी पवारांना दिला आहे. शरद पवारांना राज्यावर सरंजामी लादायची आहे का? दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.
@PawarSpeaks म्हणतात, "सत्ता हातात आल्यावर महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल." पण पवार साहेब, तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला. ५०-६० वर्ष महाराष्ट्र लुटणं, शिवरायांच्या तेजाची झळाळी हरवणं, हेच तुमचं वारसाहक्क आहे. महाराष्ट्राचा सर्वसमावेशक… pic.twitter.com/5iLER6SX2E
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 16, 2024