सोळा बेनामी कंपन्या; हजारो कोटी रुपये परदेशात पाठविले; लातूरच्या सीएने आयटीला कसे गंडवले ?

Latur : सीए व बनावट कंपन्यांची चौकशी करून आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मनी लाँडरिंग आणि परदेशी चलन व्यवस्थापन कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे.

CA LATUR FIR

CA LATUR FIR

Latur CA Booked For Issuing Certificates To Facilitate Remittance Of Hundreds Of Crores Abroad : लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय. हा घोटाळा एका सीएने ( Chartered Accountant) केलाय. तब्बल सोळा बेनामी (बनावट) कंपन्या उघडून तब्बल 2 हजारांहून अधिक कोटी रुपये परदेशात पाठविल्याचे उघडकीस आले आहे. प्रकरणी सीए श्याम शिवप्रसाद कलानी (Shyam Shivprasad Kalani) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून आयकर विभाग (Income tax Department) लातूरमध्ये ठाण मांडून होते. या सीए व बनावट कंपन्यांची चौकशी करून आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मनी लाँडरिंग आणि परदेशी चलन व्यवस्थापन कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे. आयकर विभागाच्या कसून केलेल्या तपासात मोठ्या प्रमाणावर पैशांचा गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचे उघडकीस आले आहे.


‘मिर्झापूर: द मूव्ही’तील नव्या व्यक्तिरेखांचा खुलासा; रवि किशनसह दमदार कलाकारांची झलक

उदगीर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार हा कथित व्यवहार चार वर्षांच्या कालावधीत झाला आहे. आरोपी श्याम शिवप्रसाद कलानीने योग्य पडताळणी न करता परदेशात पैसे पाठवण्यासाठी 1810 प्रमाणपत्रे जारी केल्याचे आढळून आले. ही प्रमाणपत्रे आयकर नियमांनुसार फॉर्म 15CB अंतर्गत जारी करण्यात आली होती. फॉर्म 15CB हे चार्टर्ड अकाउंटंटकडून जारी केले जाणारे प्रमाणपत्र आहे. अनिवासी व्यक्ती किंवा संस्थांना काही विशिष्ट प्रकारची देयके अथवा रक्कम परदेशात पाठवताना करपात्रता आणि कर कपातीशी संबंधित माहिती प्रमाणित करण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते. अधिकृत बँकेमार्फत रक्कम पाठवण्यापूर्वी ही प्रक्रिया केली जाते.


‘तपासात हलगर्जीपणा नको’; बारामतीतील 15 वर्षीय मुलीच्या मृत्यूवर रोहित पवार आक्रमक

कलानी यांनी संबंधित कागदपत्रांची आवश्यक पडताळणी न करताच ही प्रमाणपत्रे जारी केली. त्यामुळे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026 या कालावधीत अस्तित्वात नसलेल्या 16 कंपन्यांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचा निधी परदेशात वळविण्यात आली आहे. ही रक्कम दोन हजार कोटींचे पेक्षा जास्त असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 318(4) अंतर्गत फसवणूक, कलम 234 अंतर्गत खोटे प्रमाणपत्र जारी करणे किंवा त्यावर स्वाक्षरी करणे, कलम 229 अंतर्गत खोटे पुरावे आणि कलम 3(5) अंतर्गत समान हेतूने केलेल्या कृत्यांशी संबंधित आरोप ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास आता लातूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आलाय.

Exit mobile version