Pankaja Munde On Pritam Munde : भाजपने (BJP) काल लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत राज्यातील 20 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. बीडमधून प्रीतम मुंडे (Pritam Munde) याचं तिकीट कापून पंकजा मुंडे उमेदवारी दिली. त्यानंतर दोन्ही बहिणींनी पत्रकार परिषद घेऊन यावर प्रतिक्रिया दिली. प्रीतम मुंडेंऐवजी पक्षाने मला खासदारकीचे तिकीट दिल्याने माझ्या मनात संमिश्र भावना आहे. पण मी प्रीतम यांना विस्थापित करणार नाही. त्यांना फार काळ वाट पाहण्याची गरज नाही, असं पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.
आमदार जगतापांचे नामांतरानंतर आता जिल्हा विभागजनासाठी प्रयत्न!
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, माझ्या पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली हा माझ्यासाठी सन्मान आहे. पण मनात थोडीशी संमिश्र भावना आहे. कारण, प्रीतम मुंडे गेल्या दहा वर्षांपासून खासदार म्हणून चांगलं काम करत आल्या आहेत. पण आमच्या दोघींपैकी कोणाला तरी तिकीट मिळेल, अशी अपेक्षा मात्र नक्की होती. त्यात माझ्या नावाची घोषणा झाल्यानं कोणताही धक्का बसला नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, दुसरी गोष्ट म्हणजे नवी जबाबदारी मिळाल्यानं मनात थोडी हूरहूर आहे. कारण मी राज्यात काम करायचं आणि आता मला नवीन झोनमध्ये जावं लागणार आहे. मुळात राज्यात व जिल्ह्यातील राजकारणात मी धोरणात्मक निर्णय घेत असे. व प्रीतम मुंडे या वैयक्ति पातळीवर सर्व गोष्टी सांगाळत होत्या. त्यामुळं दोन्ही बाजू सांभाळण्याचे काम यापुढेही आम्ही करत राहू, यात कोणतीही शंका नाही.
प्रीतम मुंडेंऐवजी पक्षाने मला खासदारकीचे तिकीट दिल्याने माझ्या मनात संमिश्र भावना आहे. पण मी प्रीतम यांना विस्थापित करणार नाही. त्यांना फार काळ वाट पाहण्याची गरज नाही, मी घरी बसले तितके दिवस प्रीतम घरी बसणार नाही, असं म्हणत प्रीतम मुंडे यांना वेगळी जबाबदारी दिली जाईल, असे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले.
धनंजय मुंडेंमुळं अधिक बळ मिळेल
पंकजा मुंडे म्हणल्या की, धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. धनंजय मुंडे यांच्याशी माझा संवाद आहे. ते आणि त्यांचा पक्ष महायुतीचा भाग आहेत. त्यामुळं त्यांचा आम्हाला कोणताही त्रास होणार नाही. त्यांच्या सोबत येण्यानं आम्हाला अधिक शक्ती मिळेल आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ, याची आम्हाला खात्री वाटते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.