Beed Crime : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Case) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी सुदर्शन घुले, वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांच्यासह आणखी आरोपी तुरुंगात आहेत. आता येथूनच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी आम्हाला मारहाण केली अशी तक्रार महादेव गित्तेने कारागृह अधीक्षकांकडे केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आता या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महादेव गित्ते याने केली आहे.
वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि अन्य सहकारी सध्या बीडच्या कारागृहात आहेत. तर परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील बबन गित्ते टोळीतील महादेव गित्ते आणि त्याचे साथीदार याच तुरुंगात आहेत. 31 मार्च रोजी या सर्वांना बराकीतून बाहेर काढले होते. पण याचवेळी या दोन्ही टोळीतील संघर्ष उफाळून आला होता. वाल्मिक कराड आणि गित्ते यांच्या टोळीत बाचाबाची होऊन हाणामारी झाली होती.
जेलमधील वाल्मीक कराड मारहाण प्रकरणाला ट्विस्ट; आरोपी महादेव गित्तेने केला मोठा दावा
यानंतर कारागृह प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता. परंतु, आता महादेव गित्तेच्या तक्रारीने या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. वाल्मिक कराडच्याच (Walmik Karad) सांगण्यावरुन त्याच्या साथीदारांनी मारहाण केली असे गित्तेने या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीत त्याने म्हटले आहे की मी आणि माझे सहकारी 31 मार्च रोजी बाहेर पडलो. याचवेळी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन सुदर्शन घुले, सुदीप सोनवणे, प्रतीक घुले आणि त्यांच्या इतर साथीदारांनी आमच्यावर हल्ला केला. ही सगळी घटना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत टिपली गेली आहे. तेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा दाखल करावा अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
पोलिसांनी मात्र यापेक्षा वेगळाच दावा केला आहे. त्यामुळे त्या दिवशी तुरुंगात नेमकं काय घडलं? पोलिसांनी कशाच्या आधारावर हा गुन्हा दाखल केला? यात सत्य नेमकं काय आहे? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यातच आता महादेव गित्तेनेही तक्रार केली आहे. आता पोलीस प्रशासन या तक्रारीची काय दखल घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बीडमध्ये पुन्हा गॅंगवॉर! जेलमधील कराडच्या मारहाणीनंतर बबन गित्तेची फेसबुक पोस्ट म्हणाला अंदर मारना
वाल्मिक कराड. कपाळावर चंदणाचा गंध. पायात चप्पल नाही. कायम हातात दोन मोबाईल. तर दुसरीकडं नाव येत ते बबन गिते. दाढी वाढलेली. कपाळावर चंदन अन् कुंकवाचा गंध. कराड चप्पल घालत नाही आणि गिते दाढी करत नाही. या गोष्टींचं ‘राज’ काय विचारलं तर स्थानिक लोक सांगतात यांनी दोघांनी शपथ घेतली आहे ती एकमेकांना संपवायची. त्यामुळेच एकजण चप्पल घालत नाही तर दुसरा दाढी करत नाही. बापू आंधळेंच्या हत्येत बबन गिते यांचं नाव घेतलं जातय. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच नाव घेतलं जातय. त्यामुळे सध्या हे दोन्ही नावं महाराष्ट्रभर चर्चेत आहेत.