Dhananjay Munde : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन (Winter Session) संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात पुन्हा एकदा भाजपाचाच वरचष्मा दिसला. अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. भाजपाचाच विचार केला तर राधाकृ्ष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचं राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातूम झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडून कृषी विभाग काढून घेण्यात आला आहे. आता त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री करण्यात आलं आहे. मंत्रिपद जाहीर होताच धनंजय मुंडे यांनी सोश मिडियावर एक पोस्ट लिहीली आहे. त्यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील जनतेशी निगडीत खात असल्याने मी माजी जबाबदारी चोखपणे पार पाडील असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
विखे, मुंडे, महाजनांना धक्का, अजितदादांचा शब्दही खरा ठरला; खातेवाटपात नवं गणित
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यंत्री तथा आमचे नेते अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो. राज्यातील जनतेशी थेट निगडीत हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्या बद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यंत्री तथा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा.…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 21, 2024
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं. हिवाळी अधिवेशनातही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेवरून वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नका अशी मागणी केली जात होती.
तसेच आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पीक विम्यात मोठा घोटाळा झाल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आले आहेत. यानंतरही काल जाहीर झालेल्या खातेवाटपात त्यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली.