Download App

‘आमचं ऑपरेशन कळत नाही अन् कळलं तर.. दानवेंच्या पक्षांतराच्या चर्चा फडणवीसांनी टोलवल्या

Devendra Fadnavis : मराठवाड्यातील मोठ्या नेत्याचा पक्षात प्रवेश आधीच झालाय. या व्यतिरिक्त आणखी कुठला नेता आता प्रवेश करील असं वाटत नाही. तुम्ही माध्यमं अंबादास दानवे यांची चर्चा करताय. पण, आम्ही जर ऑपरेशन केलं तर तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांच्याबरोबर आमचा कोणताही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे कोणतीच चर्चा नाही, अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठवाड्यातील आणखी एक मोठ्या भूकंपाच्या चर्चा फेटाळून लावल्या.

Devendra Fadanvis : अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अर्थ पंतप्रधानांना हीन बोलणे नाही; फडणवीसांनी वागळेंना फटकारले !

माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली. मराठवाड्यातील मोठा नेता पक्षांतर करणार आणि या नेत्याने तुमची भेट देखील घेतली आहे, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर फडणवीस म्हणाले, तुम्ही म्हणताय त्या नेत्याने माझी भेट घेतली. तो नेता मला भेटला. तो कोण नेता आहे तुम्हीच मला सांगा. असा कोणता नेता आहे जो मीडियाला माहिती आहे पण मला नाही,  असा खोचक टोला लगावला.

आता मीच तुम्हाला विचारतो, असा कोणता भूकंप आहे. चांगलं नाव असेल तर सांगा म्हणजे आम्ही सुद्धा त्याचा पाठलाग करू. निवडणूक आहे म्हटल्यानंतर पक्षप्रवेश होतच असतात. तुम्ही संशयाच्या घेऱ्यात ज्यांनी उभे करताय त्यातील एकही नेता आमच्या संपर्कात नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अब सब बिघड गये तुम्हारे उपर’ जरांगेंची सुरुवातच देवेंद्र फडणवीसांपासून

महायुतीला अजूनही धाराशिवचा उमेदवार जाहीर करता आलेला नाही. महायुतीचं जागावाटप कुठं अडलं आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारले. यावर फडणवीस म्हणाले, चार पाच जागांवर आमचं अडलंय हे खरं आहे. एक जागा अडली की तीन जागा अडतात. फार अडलंय असं नाही येत्या एक दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल.

follow us