Download App

मराठवाड्यात मविआचं पारडं जड! महायुतीला केवळ 17 ते 18 जागा, एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी

मविआला मराठवाड्यात 27 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात भाजप-महायुतीला फटका बसले, असं या पोलमध्ये वर्तवलं.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Exit Poll : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election)आज मोठ्या उत्साहात मतदान झाले. राज्यातील दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यानुसार राज्यात महायुतीची (Mahayuti) सत्ता येण्याचा अंदाज दिसून येत असून महाविकास आघाडी सत्तेच्या जवळ-जवळ जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात भाजप-महायुतीचा चांगलाच पराभव फटका बसू सकतो, असंही या पोलमध्ये वर्तवण्यात आलं.

पुण्यात कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी? वाचा, एक्झिट पोलचा कल 

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर भाजप महायुतीला पराभव पत्करावा लागला होता. विधानसभेलाही मराठवाड्यात भाजप महायुतीला फटका बसेल अशी स्थिती पोलमध्ये वर्तवली.

मराठवाड्यात महायुतीला 17 ते 18 जागा…
SAS ग्रुप हैदराबादच्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीला 125 ते 135 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी 147 ते 155 जागा जिंकू शकते. मराठवाड्यातील 46 जागांपैकी भाजप-महायुतीला 17 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. येथे महाविकास आघाडीचं पारडं जड असल्याचं दिसून येतं, मविआला मराठवाड्यात 27 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात भाजप-महायुतीला फटका बसले, असं या पोलमध्ये वर्तवलं.

विदर्भात मविआला फटका, महायुती मारणार मुसंडी, एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा? 

मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार, असा अंदाज Zeenia AI Exit Poll ने व्यक्त केलाय. मराठवाड्यात मविआला 24 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 16 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

चाणक्यचा पोल सांगतोय महायुतीचं सरकार
चाणक्य स्ट्रॅटेजीनेही महाराष्ट्र निवडणुकीचे अंदाज दिले आहेत. यानुसार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असा अंदाज चाणक्यने व्यक्त केला आहे. सहा ते आठ जागा अपक्षांना आणि अन्य पक्षांना मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

follow us