Download App

.. तर शेतकरी तुम्हाला रुमण्याने बदडून काढील; BRS मध्ये जाताच जाधवांचा सरकारवर हल्लाबोल

Harshavardhan Jadhav :तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत (BRS) प्रवेश केल्यानंतर कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांच्या शब्दांना धार चढली आहे. त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर तुफान हल्ला चढवला आहे. शिंदे – फडणवीस सरकार कांदा खरेदी बाबतीत काहीच बोलणार नसेल आणि त्यांचे कार्यकर्ते उगाच तेलंगणात कांद्याला भाव नाहीत अशा पद्धतीने रस्त्याने बोंबलत फिरून तेलंगणाची बदनामी करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणार असताल तर कांदा उत्पादक शेतकरी तुम्हाला रुमण्याने बदडल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा बीआरएसचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आज दुपारी कन्नड तालुक्यातील हतनूर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होत जाधव यांनी राज्य सरकावर घणाघाती टीका केली.

पंकजा मुंडे BRS मध्ये जाणार का? ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं खरं कारण

ते म्हणाले, इथला कांदा तेलंगणात पाठविल्यानंतर राज्यातील नेते आणि राज्यकर्त्यांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आता तेलंगणात कांद्याला भाव मिळत नाही असे बोंबलत फिरत आहेत. तुमचे सरकार कांद्याच्या बाबतीत काय करत आहे ते आधी सांगा, असा सवाल त्यांनी केला. फक्त बीआरएसच्या नावाने बोंबा मारत राजकारण करण्यापेक्षा 350 रुपये अनुदान दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकतो तसेच शासकीय खरेदी केंद्र सुरू करून 1800 रुपयांनी कांदा खरेदी करतो असे पत्र द्या मग आम्हीही तुमच्या सरकारला सलाम ठोकू, असे जाधव म्हणाले.

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात यावे. तसेच पक्षात आल्यास त्यांना मुख्यमंत्री करू अशी ऑफर बीआरएसच्या महाराष्ट्र समन्वयकांनी दिली आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. नेते मंडळींचे पक्षांतर वाढले आहे. बीआरएस सध्या ज्या पद्धतीने राज्यात पक्ष विस्तार करत आहे. पक्षाकडून ज्या पद्धतीने जाहिरातबाजी केली जात आहे. खुद्द मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील नेते राज्यात सारखे येत आहेत. त्यावरून राज्यातील अन्य पक्षांनीही त्यांच्या हालचाली टिपण्यास आता सुरुवात केली आहे.

Manipur violence; अमित शाहांच्या सर्वपक्षीय बैठकीला पवार-ठाकरे-शिंदेंची दांडी

Tags

follow us