पंकजा मुंडे BRS मध्ये जाणार का? ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं खरं कारण

पंकजा मुंडे BRS मध्ये जाणार का? ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं खरं कारण

BRS News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. त्यानंतर आता भाजपात (BJP) नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीआरएसने पक्षात येण्याची आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. या घडामोडींनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Nana Patole : फालतू भानगडीत पडण्यापेक्षा भाजपपासून सावध रहा; पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पंकजा मुंडे खरेच बीआरएसमध्ये प्रवेश करतील का, किंवा त्यांच्या बीआरएसमधील प्रवेशाने या पक्षाची राज्यातील स्थिती सुधारेल का, असे प्रश्न दानवेंना विचारण्यात आले. त्यावर दानवे म्हणाले, पंकजा मुंडे या राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्या आहेत. मी त्यांना काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्या आज नाही तर उद्या नेतृत्व करतील. त्या भाजपात आत्ताही नेतृत्व करत आहेत आणि आतापर्यंत नेतृत्व करत आल्या आहेत. परंतु, एखादं पद मिळालं नाही म्हणून नेतृत्व नाही असं कुणी सांगितलंय असा सवाल दानवे यांनी केला.

पंकजा मुंडे कायमच नेत्या राहतील

याच मुद्द्यावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शेलार म्हणाले, कपोलकल्पित प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत. आज आहेत उद्या आहेत आणि पर्वाही राहतीलच.

“देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे, लक्षात ठेवा…” ठाकरेंचा फडणवीसांना गर्भित इशारा

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात यावे. तसेच पक्षात आल्यास त्यांना मुख्यमंत्री करू अशी ऑफर बीआरएसच्या महाराष्ट्र समन्वयकांनी दिली आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. नेते मंडळींचे पक्षांतर वाढले आहे. बीआरएस सध्या ज्या पद्धतीने राज्यात पक्ष विस्तार करत आहे. पक्षाकडून ज्या पद्धतीने जाहिरातबाजी केली जात आहे. खुद्द मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील नेते राज्यात सारखे येत आहेत. त्यावरून राज्यातील अन्य पक्षांनीही त्यांच्या हालचाली टिपण्यास आता सुरुवात केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube