Manipur violence; अमित शाहांच्या सर्वपक्षीय बैठकीला पवार-ठाकरे-शिंदेंची दांडी
Manipur Violence: मणिपूर गेल्या दोन महिन्यांपासून धुमसत आहे. 3 मेपासून सुरू झालेल्या मेईतेई आणि कुकी समुदायांमधील जातीय संघर्षात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून गृहमंत्री अमित शहा सर्वपक्षीय बैठक घेत आहेत. या बैठकीला महाराष्ट्रातील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते जाणार नाहीत. राष्ट्रवादीकडून संघटन सचिव नरेंद्र वर्मा हे उपस्थित राहिले आहेत तर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हजेरी लावली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार होते पण खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॅप्टर साताऱ्यात उतरु न शकल्याने त्यांच्या ऐवजी मंत्री दिपक केसरकर आणि खासदार राहूल शेवाळे उपस्थित राहिले आहेत.
Russia Wagner Rebel: रशियाला मिळणार नवा राष्ट्राध्यक्ष; शिलेदाराचा पुतिन यांच्याविरोधात शड्डू
या बैठकीत मणिपूरचे माजी मुख्यमंत्री इक्रम इबोबी सिंग काँग्रेसकडून सहभागी झाले आहेत. मणिपूरबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी सर्वच राजकीय पक्ष अनेक दिवसांपासून करत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही याच महिन्यात मणिपूरला भेट दिली होती, मात्र तरीही परिस्थिती सुधारलेली नाही. शुक्रवारी रात्री जमावाने राज्य सरकारचे मंत्री एल.के. सुसिंद्रोचे खाजगी गोडाऊन फोडण्यात आले. त्यांचे घरही जाळण्याचा प्रयत्न झाला. याआधी केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह आणि राज्याच्या महिला मंत्री नेमचा किपगेन यांच्या घरावरही हल्ले आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
खुंटीचं हिंदुत्व वेशीला टांगलं : पाटणा दौरा, मुफ्तींची भेट अन्…; CM शिंदेंनी सगळचं काढलं
हे नेते बैठकीला उपस्थित
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, भाजप नेते पिनाकी मिश्रा, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन, सीपीआय(एम) खासदार जॉन ब्रिटास, खासदार प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी नेते नरेंद्र वर्मा यांच्यासह महाराष्ट्रातून मंत्री दिपक केसरकर, खासदार राहूल शेवाळे हे उपस्थित आहेत. या बैठकीत केंद्र सरकार सर्व पक्षांच्या नेत्यांना हिंसाचार आणि त्याच्या कारणांची माहिती देणार आहे.