‘राज्यात नाही, निदान केंद्रात तरी मंत्रीपद द्या’; शिंदेंच्या आमदाराने करून दिली ‘त्या’ शब्दाची आठवण

Santosh Bangar : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार यांच्या गटाला काल खातेवाटपही करण्यात आले. मात्र, एक वर्षाआधी शिवसेनेत अशाच पद्धतीने बंड करून भाजपसोबत आलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांना अजूनही मंत्रीपदे मिळाली नाहीत. उलट राष्ट्रवादीच्या आमदारांना खाते देताना शिंदे गटातील काही मंत्र्यांचे खाते काढून त्यांना दुसरे खाते दिले गेले. यानंतरही आपल्यावर अन्याय होणार नाही […]

Untitled Design (18)

MLA Santosh Bangar

Santosh Bangar : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार यांच्या गटाला काल खातेवाटपही करण्यात आले. मात्र, एक वर्षाआधी शिवसेनेत अशाच पद्धतीने बंड करून भाजपसोबत आलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांना अजूनही मंत्रीपदे मिळाली नाहीत. उलट राष्ट्रवादीच्या आमदारांना खाते देताना शिंदे गटातील काही मंत्र्यांचे खाते काढून त्यांना दुसरे खाते दिले गेले. यानंतरही आपल्यावर अन्याय होणार नाही अशी भावना शिंदे गटातील आमदार बोलून दाखवत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्रीपद दिले गेले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीमुळे शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होणार नाही. केंद्रात किंवा राज्यात हिंगोली जिल्ह्याला मंत्रीपद द्यावे, यासाठी आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदे यांना भेटणार आहे, असे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी सांगितले.

थेट सचिन तेंडुलकर आला बच्चू कडूंच्या रडारवर; CM शिंदेंना पत्र लिहून केली मोठी मागणी

हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आम्हाला मंत्रीपदाचा शब्द दिला गेला आहे. हा शब्द पाळला जाणारच आहे. केंद्रात किंवा राज्यात हिंगोली जिल्ह्याला मंत्रीपद द्यावे, यासाठी आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. हिंगोली जिल्हा मागासलेला असून या भागाच्या विकासासाठी मंत्रीपद द्यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे बांगर यांनी सांगितले.

कोणाकडे कोणतं खातं?

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग .

“तुम्ही माझी भावकी… सरकारला माझंही तिसरं इंजिन : अजितदादांची केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणात सुधारणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

Exit mobile version