Ambadas Danve : मागील दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अशा चर्चा सुरू आहेत की ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपात प्रवेश करील. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही माध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले होते. हे नेते म्हणजे अंबादास दानवे आहेत का (Ambadas Danve) अशी चर्चा सुरू झाली. मात्र, या सगळ्या चर्चा, न्यूज चॅनेल्सकडून दिल्या जाणाऱ्या बातम्या धादांत खोट्या आहेत. मी कुठेही जाणार नाही ठाकरे गटातच राहणार आहे, असे स्पष्ट करत येत्या 4 जूनला मराठवाड्यात महायुतीची एकही जागा निवडून येणार नाही हाच राजकीय भूकंप असेल अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पक्षांतराच्या वावड्या उठवणाऱ्यांना ठणकावले.
Lok Sabha Election : नवनीत राणांना कडव्या विरोधानंतर भाजपसाठी अमरावती जड?
अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत या बातम्यांवर संताप व्यक्त केला. तसेच आगामी काळात या विरोधात कठोर पावले उचलण्याचा इशाराही दिला. दानवे म्हणाले, मी तीस वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहे. याआधीही मी स्पष्ट केलं होतं की मी कुठेही जाणार नाही. ठाकरे गटातच राहणार आहे. तरीदेखील पक्षांतराच्या बातम्या दिल्या जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यामध्ये भाजपाचे दलाल यात आहेत. कोणत्याही बातम्या चालवू नका. माझ्या पक्षप्रवेशाच्या बातम्या खोट्या. मी शिवसेनेचा आहे. या गोष्टी करायच्या असत्या तर आधीच केला असता. मी काम करणारा शिवसैनिक आहे. ज्यांनी बातम्या लावल्या त्या चुकीच्या आहेत आणि खोट्या आहेत, असे दानवे म्हणाले.
तुम्हा नाराज होतात अशा चर्चा होत्या असे विचारल्यानंतर नाराज असलं म्हणून काय झालं. तुम्ही काय खूश असता का असा उलट सवाल त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना विचारला. मी तीस वर्षांपासून शिवसेनेचं काम करतोय. 20 वर्षांपांसू जिल्हाध्यक्ष होतो. आधी शिवसेना भाजप युती होती म्हणून काय भाजपात गेलो का असा सवाल अंबादास दानवे यांनी यावेळी उपस्थित केला.
अंबादास दानवे यांना हप्त्याचे रेट माहित कसे? ते त्यात आहेत का? संदीपान भुमरेंचा दानवेंना सवाल
मी कुठेही जाणार नाही मी ठाकरे गटातच राहणार आहे. माझ्यात आणि चंद्रकांत खैरे यांच्यात कोणतेच मतभेद नव्हते. आमच्यात काहीच वाद नाही. खैरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही संभाजीनगरात काम करत आहोत. त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं, असे म्हणत दानवे यांनी या वादावर पडदा टाकला. मला महायुतीची कोणतीही ऑफर नाही, त्यांच्यात आमच्याशी भिडण्याची ताकद नाही. 4 जूनला मराठवाड्यात महायुतीची एकही जागा येणार नाही. हाच मोठा भूकंप असेल, असे प्रत्युत्तर त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांना दिले.