Ambadas Danve : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून दानवेंनी शिंदे-फडणवीसांना सुनावले

Ambadas Danve : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून दानवेंनी शिंदे-फडणवीसांना सुनावले

Ambadas Danve On Shinde-Fadanvis : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीठ झाली. चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात गारपीट, वादळी वाऱ्याचा साडेनऊ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून (Department of Agriculture) देण्यात आली.

यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांनी तात्काळ मदत करण्याचा सल्ला दिला आहे. दानवे म्हणाले की शेतकऱ्यांच्या नुकसानिचे पंचनामे होत राहतील पण एनडीआरएफ, एसडीआरएफच्या औपचारिकतेत न गुंतता शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना तातडीने विशेष मदत पॅकेज द्या. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

Gulabrao Patil : बंडाला नऊ महिने झाले, आम्हाला छळण्यापेक्षा पक्षबांधणी करुन सरकार आणायचा विचार करा

यावेळी त्यांनी सांगितले की, मी नाशिक आणि संभाजीनगर जिल्ह्यात फिरलो. आज बीड, परवा उस्मानाबाद अमरावती, अकोला, यवतमाळ या चार जिल्ह्यात जाणार आहे. शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यावर कळते की, नुकसान किती झालेले आहे. नाशिकमधील बँका शेतकऱ्यांना वसुलीसाठी तगादा लावत आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. द्राक्षाचे नुकसान झालेले आहे कांद्याचे झालेले आहे. असे असताना किती ठिकाणी मालमत्तेचे सुद्धा नुकसान झालेले आहे? संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या गावात देखील नुकसान झालेले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube