Lok Sabha Election : नवनीत राणांना कडव्या विरोधानंतर भाजपसाठी अमरावती जड?

Lok Sabha Election : नवनीत राणांना कडव्या विरोधानंतर भाजपसाठी अमरावती जड?

Bachchu Kadu : अमरावतीत खासदार नवनीत राणा यांना भाजपने (Navneet Rana) उमेदवारी दिली आहे. मित्रपक्षातील नेत्यांचा विरोध डावलून भाजपनं हे धाडस दाखवलं. पण आता राणांच्या उमेदवारीनंतर महायुतीत बंडखोरीच्या शक्यता व्यक्त होत आहेत. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात न्यायालयात घेतलेली धाव. आनंदाव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची अपक्ष लढण्याची तयारी, आमदार बच्चू कडूंचा रुद्रावतार, स्थानिक  नेत्यांची नाराजी या सगळ्या वजाबाकी नवनीत राणांची वाट अडवणार का? असा प्रश्न उभा राहतोच. पहिला धक्का बसणार की हा विरोध शांत करण्यात महायुतीच्या वरिष्ठांना यश येणार यावर अमरावतीचं मतदरसंघाचं गणित अवलंबून राहणार आहे.

तसं पाहिलं तर, लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच अमरावतीत राजकीय फटाके फुटत होते. त्यानंतर यथावकाश निवडणुका जाहीर झाल्या. पुढे उमेदवारी कुणाला द्यायची याचा खल राजकीय पक्षांत सुरू झाला. तर दुसरीकडे नवनीत राणांना विरोध वाढू लागला. नवनीत राणांना तिकीट दिल्यास त्यांचा प्रचार करणार नाही असा विरोधाचा आवाज बच्चू कडूंनी उठवला. शिंदे गटानेही मतदारसंघावर दावा ठोकला. या मतदारसंघात आधी शिवसेनेचाच खासदार होता. तेव्हा या मतदारसंघात उमेदवारीचा दावा शिंदे गटाचे नेते माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी केला. फक्त दावा करूनच अडसूळ गट थांबलेला नाही तर अभिजीत अडसूळ यांनी अपक्ष लढण्याची तयारीही सुरू केली आहे.

Bachchu Kadu : भविष्यात भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकतात; कडूंच्या वक्तव्याने खळबळ!

पण, हा सगळा विरोध डावलून भाजपने नवनीत राणा यांनाच तिकीट दिलं. फक्त तिकीटच दिलं नाही तर त्यांचा पक्षप्रवेशही घडवून आणला. नवनीत राणा आता भाजपाच्या  कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. मात्र यासाठी त्यांनाही मोठा त्याग करावा लागला आहे. नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा यांच्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा त्यांनी दिला. राजीनामा देताना राणा भावूक झाल्या होत्या. या पक्षप्रवेशावेळी एक गोष्ट ठळक दिसून आली ती म्हणजे स्थानिक नेते हजर होते. म्हणजे, स्थानिक पातळीवर नवनीत राणांना होत असलेला विरोध शांत करण्याची पहिली लढाई भाजपनं जिंकली असेच म्हणावे लागेल.

तर दुसरीकडे नवनीत राणा यांना भाजपने तिकीट दिल्यानंतर आमदार बच्चू कडूही प्रचंड संतापले. नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांनी तडक मुंबई गाठली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. या मुद्द्यावर पुन्हा बैठक घेऊ काहीतरी निर्णय घेऊ असे कडूंना सांगितले. पण, बच्चू कडू सध्या तरी माघार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचेही संकेत त्यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही मग महायुतीतून बाहेर पडण्याची वेळ आली तरी चालेल, इथपर्यंत त्यांची मानसिकता झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी बच्चू कडू त्यांच्या सोबत होते. त्यावेळी आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू पैसे घेऊन गुवाहाटीला गेले होते असे वक्तव्य केले होते. हेच वक्तव्य बच्चू कडू यांच्या जिव्हारी लागले होते.  हे वक्तव्य बच्चू कडू अजूनही विसरलेले नाहीत. त्यांचा राणांना आता जो टोकाचा विरोध होत आहे त्यामागे रवी राणा यांचे हे कडवट बोल कारणीभूत असल्याचेही आता सांगण्यात येत आहे.

एकूणच, महायुतीतील या नाराजी नाट्याने नवनीत राणा यांची वाट खडतर केली आहे. अमरावतीमधील हा अंतर्गत संंघर्ष महायुतीचे नेते कसा मिटवतात, यावर मतदारसंघातील जय पराजयाची गणित अवलंबून राहणार आहेत हे मात्र नक्की.

अमरावतीत महायुतीचं गणित बिघडणार?

त्यामुळे अमरावतीचं महायुतीचं गणित बिघडणार तर नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. सध्याच्या राजकीय दृश्यात महायुतीच्या मित्र पक्षांचा हा विरोध जास्त तीव्र झालेला नाही. चर्चेला वाव अजूनही आहे. शिंदे गट असो किंवा बच्चू कडू असतो या दोघांचाची विरोध शांत करण्याची मोठी कसरत महायुतीच्या नेत्यांना करावी लागणार आहे.

Lok Sabha Election: मोदींसाठी आरएसएस कशी ताकद लावतंय ? कसं आहे मायक्रो प्लॅनिंग

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज