Navneet Rana : ‘ठाकूरांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या अन् दुसऱ्याचं काम केलं’

Navneet Rana : ‘ठाकूरांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या अन् दुसऱ्याचं काम केलं’

Navneet Rana : यशोमती ठाकूर यांनी रवी राणा(Ravi Rana) यांच्याकडून कडक नोटा घेऊन दुसऱ्याचं काम केलं असल्याची पोलखोल खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी केली आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी हा गौप्यस्फोट केल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.

अखेर कॅनडाच्या पंतप्रधानांच्या फ्लाइटचे उड्डाण, G20 नंतर दोन दिवस दिल्लीत खोळंबले

पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, यशोमती ठाकूर काय इमानदारीची भाषा करणार? यशोमती ठाकूर यांनी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर रवी राणांकडून कडक नोटा घेऊन दुसऱ्याचं काम केलं आहे, त्यामुळे त्या काय इमानदारीची भाषा करणार? असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे.

जरांगेंकडून सरकारला एक महिना; उपोषण सोडण्यासाठी सीएम, डीसीएम, दोन्ही राजेंनी यावे

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भाजप-महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चुरस सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप-प्रत्यारोप करीत असल्याचंही दिसून येतंय. अशातच आता नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला आहे.

मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव धुडकावला, आंदोलनाचा निर्णय उद्या होणार

नवनीत राणा यांच्या विधानामुळे अमरावतीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून 2019 लोकसभा निवडणुकीत रवी राणांनी ठाकूर यांना कडक नोटा दिल्याच्या वक्तव्याने नवनीत राणा यांनी निवडणुकीत पैसे वाटप केल्याचं बोललं जात आहे. निवडणुकीत पैसे वाटूनच नवनीत राणा जिंकल्या असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करीत यशोमती ठाकूर यांच्यावरही निशाणा साधला होता. अमरावतीत आयोजित केलेल्या एका दहिहंडीच्या कार्यक्रमात रवी राणा यांंनी वादग्रस्त विधान केलं होतं. राणा म्हणाले, दर्यापूरचा आमदार तिवसा मतदारसंघाच्या आमदाराच्या चप्पला उचलत असल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. रवी राणांचं हे विधान चर्चेत असतानाच आता नवनीत राणा यांनीही यशोमती ठाकूरांबद्दल गौप्यस्फोट केल्याने अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube