‘लोकांची वीज तोडली तर तुमचे लायसनच रद्द करू’; महावितरणच्या कारभारावर जाधव भडकले

Marathwada News : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार महावितरणने गुणवत्तापूर्वक वीज देणे बंधनकारक आहे. त्यासाठी वीज गुणवत्ता नियंत्रक यंत्र बसवणे आवश्यक आहे. मात्र असे यंत्र कुठेही दिसत नाही. दुसरीकडे शेतकरी आणि सर्वसामान्यांची वीज तोडण्याचा धडाका लावला आहे. या प्रकारांवरून माजी आमदार भारत राष्ट्र समितीचे नेते हर्षवर्धन जाधव कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच […]

Harshawardhan Jadhav

Harshawardhan Jadhav

Marathwada News : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार महावितरणने गुणवत्तापूर्वक वीज देणे बंधनकारक आहे. त्यासाठी वीज गुणवत्ता नियंत्रक यंत्र बसवणे आवश्यक आहे. मात्र असे यंत्र कुठेही दिसत नाही. दुसरीकडे शेतकरी आणि सर्वसामान्यांची वीज तोडण्याचा धडाका लावला आहे.

या प्रकारांवरून माजी आमदार भारत राष्ट्र समितीचे नेते हर्षवर्धन जाधव कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. नियामक आयोगाच्या आदेश आणि कायद्यानुसार तुम्हाला वीज कट करता येणार नाही. तुम्ही लोकांची वीज कट करण्याचा अट्टाहास कराल, तर मी तुमच्या वीज वितरणाचे लायसन्स रद्द करण्याचा अट्टाहास करील, असा इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महावितरणला दिला आहे.

पनवेल-नांदेड ट्रेन प्रवाशांनी रोखली, झुरळांचा बंदोबस्त केला तरच ट्रेन पुढे जाऊ देणार

वीजबिल थकले म्हणून कन्नड तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचा वीज पुरवठा कट केला जात आहे. या प्रकारावरून जाधव यांनी महावितरणवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, नियामक आयोगाच्या निर्देशानुसार गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा आणि त्याचे मोजमाप करणारे यंत्र महावितरणने बसवणे बंधनकारक आहे. असे असताना राज्यात कुठेही असे यंत्र बसवल्याचे दिसत नाही. त्यामुळे लोकांना जो वीजपुरवठा केला जात आहे तो गुणवत्तापूर्ण आहे का याची तपासणीच होत नाही. असे असताना वीजबिल थकले म्हणून वीज पुरवठा कोणत्या नियमाने कट करता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जर लोकांचा वीज पुरवठा तोडण्याचे काम केले तर तुमचा वीज वितरणाचा परवानाच रद्द करण्याची मागणी वीज नियामक आयोगाकडे करू असा इशारा जाधव यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

Exit mobile version