पनवेल-नांदेड ट्रेन प्रवाशांनी रोखली, झुरळांचा बंदोबस्त केला तरच ट्रेन पुढे जाऊ देणार

पनवेल-नांदेड ट्रेन प्रवाशांनी रोखली, झुरळांचा बंदोबस्त केला तरच ट्रेन पुढे जाऊ देणार

Panvel-Nanded Train : पनवेलवरुन नांदेडला जाणारी ट्रेन प्रवाशांनी दोन तासाहून अधिक काळ पुणे रेल्वे स्थानकावर रोखून धरली होती. याचे कारण म्हणजे ट्रेनमधील झुरळांच्या सुळसुळाटाला वैतागून प्रवशांनी हे टोकाचे पाऊल उचलेले होते. ट्रेनमधील झुरळांचा बंदोबस्त केला जात नाही तोपर्यंत ट्रेन पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली होती. या ट्रेनमध्ये इतकी झुरळं आहेत की पुढे प्रवास करणं अशक्य झाल्याने पुणे स्टेशन आल्यावर प्रवासी आक्रमक झाले होते. ट्रेनमधील झुरळं काढण्यासाठी प्रवाशांनी आंदोनलच पुकारले.

आक्रमक झालेल्या प्रवाशांची समजूत काढण्यासाठी कर्मचारी आणि टीसी ट्रेनमध्ये दाखल झाले पण प्रवासी आपल्या भूमिकेवरुन मागे हाटायला तयार नव्हते. आधी झुरळांचा बंदोबस्त करा तोपर्यंत ट्रेन पुढं जाणार नाही यावर आडून बसले होते.

Kishor Patil Audio Clip : ‘होय, मी शिव्या दिल्या’; आमदार किशोर पाटलांची कबुली

पनवेलवरुन दुपारी चार वाजता नांदेडसाठी ट्रेन सुटली होती. पण काही वेळात एसी बोगीमधील झुरळांचा प्रवाशांचा त्रास होऊ लागला. महागाचे तिकिट काढल्यानंततही प्रवशांना सुविधा न मिळाल्यामुळे सर्वांनी आक्रमक भूमिका घेतली. लोकांनी ट्रेन पुणे स्टेशनपासून पुढे जाऊ न देण्याचा निर्णय घेतला. टीसी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube