लक्षात ठेवा, सभेमुळे परिस्थिती चिघळली तर.. शिरसाटांचा महाविकास आघाडीला इशारा

छत्रपती संभाजीनगरात उसळलेल्या दंगलीमुळे शहरात तणावाची परिस्थिती आहे. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यात आता येत्या 2 एप्रिल रोजी शहरात महाविकास आघाडीची सभा होणार असून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या सभेवरून ठाकरे व शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिंदे गटाचे आमदार […]

Sanjay Shirsath

Sanjay Shirsath

छत्रपती संभाजीनगरात उसळलेल्या दंगलीमुळे शहरात तणावाची परिस्थिती आहे. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यात आता येत्या 2 एप्रिल रोजी शहरात महाविकास आघाडीची सभा होणार असून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

या सभेवरून ठाकरे व शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. या सभेमुळे शहरातील परिस्थिती चिघळल्यास याला आयोजक जबाबदार राहतील, असा इशारा त्यांनी दिला.

Imtiyaz Jaleel : सरकारवर विश्वास नाही, दंगलीची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करा

ते म्हणाले, काँग्रेस पक्ष समाजात दुही माजवत आहे. या काँग्रेसला आता गाडले पाहिजे असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. पण उद्धव ठाकरेंच्या एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आहे. ही खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी गद्दारी आहे. आम्हाला यातना होतात, असे शिरसाट म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी शहरात दंगली झाल्या आहेत. पोलिसांची वाहने या दंगलीत जाळली गेली आहेत. शहरात आजही तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सभा घेणे योग्य होणार नाही. सभा घेऊ नका म्हणून त्यांना जर विरोध केला तर ते लोकशाहीचा गळा घोटला म्हणून ओरड करतील. तेव्हा त्यांनी सभा घ्यावी मात्र यामुळे जर शहरातील परिस्थिती चिघळली तर त्यास आयोजक जबाबदार राहतील असा इशारा शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.

मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

दंगलीची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींकडून करा – जलील

दरम्यान, पोलिसांनी आणि सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी मागणी करावी की, हायकोर्टाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर दंगलीची चौकशी करावी. माझा या सरकावर विश्वास राहिला नाही, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर दंगलीप्रकरणी पोलिसांनी ४०० ते ५०० लोकांवर गुन्हे दाखल केला. याच पार्श्वभूमीवर एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel )यांनी पोलिसांवर आणि राज्य सरकारवर आरोप केला आहे.

Exit mobile version