Download App

अशोक चव्हाणांचा दे धक्का ! नांदेडही महाविकास आघाडीचेच; भाजप-शिंदे गटाला झाडून काढलं

Nanded APMC Election Result : भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यशस्वी घोडदौड सुरुच ठेवली आहे. नांदेड बाजार समितीतही (Nanded APMC Election) जबरदस्त कामगिरी करत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नेतृत्वातील पॅनलने सर्व 18 जांगावर विजय मिळवला आहे. नांदेड बाजार समिती मतदानाची मतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने चमकदार कामगिरी करत भाजपसह शिंदे गटाला चांगलाच झटका दिला आहे.

महेंद्र थोरवेंना पुढच्या निवडणुकीत गुलाल लागू देणार नाही, सुषमा अंधारेंचं खुलं आव्हान

या निवडणुकीत काँग्रेस 12, राष्ट्रवादी काँग्रेस 3, ठाकरे गट 2 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. विशेष म्हणजे, या अपक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देऊनही टाकला. भाजप आणि शिंदे गटाला मात्र नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर, शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील तसेच आमदार बालाजी कल्याणकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

मात्र, मतदारांनी भाजप आणि शिंदे गटाला साफ नाकारले. महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कौल दिला. या विजयानंतर नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.

महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; जयंत पाटलांना विश्वास

खानदेशात शिंदे गटाला दणका

खानदेशातील धुळे, जळगाव आणि नंदूबार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल लागले आहेत. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव , परोळा , चोपडा , रावेर, जामनेर आणि भुसावळ या सहा बाजार समित्यांचे निकाल लागले आहेत. यात परोळा या आतिशय चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सतीश पाटिल यांनी शिवसेना (शिंदे गट) चे आमदार चिमण आबा पाटील यांचा धुव्वा उडवला. एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यानंतर भुसावळ बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जोरदार झटका बसला. एकनाथ खडसे यांचे शिष्य समजले जाणारे भाजप आमदार संजय सावकारे यांनी आपल्या गुरु एकनाथ खडसे यांचा पराभव केला.

Tags

follow us