महेंद्र थोरवेंना पुढच्या निवडणुकीत गुलाल लागू देणार नाही, सुषमा अंधारेंचं खुलं आव्हान
Sushma Andhare On Mahendra Thorave : उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray group)उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare)रायगड जिल्ह्यातील कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorave)यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी सुषमा अंधारेंना आमदार थोरवेंना दिला जातोय की काय, असा प्रश्न केल्यानंतर अंधारें म्हणाल्या की, कुठेतरी शह वैगेरे काही नाही, शह फार मोठ्या माणसांना दिला जातो. थोरवे आमच्यामुळे निवडून आलेला आहे. जर थोरवेंनी आमचा हात सोडला असेल तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. मी सांगितलं की, पुढच्या निवडणुकीत थोरवेंना गुलाल लागणार नाही, असं थेट आव्हान ठाकरे गटाच्या फायरब्रॅंड नेत्या सुषमा अंधारेंनी स्थानिक आमदार महेंद्र थोरवेंना आव्हान दिलं आहे.
‘बारसू’वर आंबेडकरांचा संताप ! म्हणाले, आपले सत्ताधारी केंद्रातून फोन आल्यावर..
खोपोलीतील महाप्रबोधन यात्रेनंतर सुषमा अंधारेंनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या म्हणाल्या की, महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातील एकेक प्रश्न उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आम्ही पत्रकारांवरील हल्ले, वाढती असुरक्षितता हा मुद्दा आम्हाला अत्यंत महत्वाचा वाटला.
ज्या प्रकारे सुजात बुखारीची हत्या झाली, राणा आयुबला थ्रेट देण्यात आले किंवा कप्पनला दोन वर्ष जेलमध्ये राहावं लागला किंवा वारिसेची हत्या झाली. त्यामुळे महाप्रबोधन यात्रेचा हा एपिसोड पत्रकारांसाठी डेडीकेटेड करावा असं वाटलं आणि आम्ही तो केला असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सुषमा अंधारेंना आमदार थोरवेंबद्दल प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या की, आमदार थोरवेंना शह वैगेरे काय हो, शह फार मोठ्या माणसांना दिला जातो. थोरवे आमच्यामुळे निवडून आलेला माणूस आहे. जर थोरवेंनी आमचा हात सोडला असेल तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. मी सांगितलं की, पुढच्या निवडणुकीत थोरवेंना गुलाल लागणार नाही, असं थेट आव्हानचं सुषमा अंधारेंनी आमदार महेंद्र थोरवेंना दिलं आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार महेंद्र थोरवे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे साहजिकच सद्यस्थितीचा विचार करता गणितं बदलणार आहेत. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गट या भागात आपलं लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता आहे. त्यातच आता आमदार महेंद्र थोरवेंना सुषमा अंधारेंनी थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी संपुर्ण राणे परिवाराला लक्ष केलं आहे. राणेंची दोन्ही मुलं विद्वान आहेत. त्यांच्याबद्दल आपण बोलू नये, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.