रोहित पवार, तानाजी सावंत भिडले; ‘खेकडा’ अन् ‘बारामती’च्या पॅकेजचा असाही किस्सा!

Rohit Pawar vs Tanaji Sawant : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात चांगलीच जुंपली आहे. धाराशिव दौऱ्यावर असताना आ. पवार यांनी खेकड्याची उपमा देत मंत्री सावंत यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यांची ही टीका सावंतांना चांगलीच झोंबली असून त्यांनीही पवारांवर जोरदार पलटवार केला आहे. यापुढे तुम्ही अशाच भाषेत टीका करण्याचा प्रयत्न […]

Rohit Pawar

Rohit Pawar

Rohit Pawar vs Tanaji Sawant : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात चांगलीच जुंपली आहे. धाराशिव दौऱ्यावर असताना आ. पवार यांनी खेकड्याची उपमा देत मंत्री सावंत यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यांची ही टीका सावंतांना चांगलीच झोंबली असून त्यांनीही पवारांवर जोरदार पलटवार केला आहे. यापुढे तुम्ही अशाच भाषेत टीका करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा माझे पदाधिकारीही ठोक शब्दांत प्रत्युत्तर देतील असा इशारा सावंत यांनी दिला. सावंत यांनी रोहित पवारांच्या वयाचाही उल्लेख केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीनेही पलटवार केला.

आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आता नंबर काँग्रेसचा; विखेंच्या दाव्याने खळबळ!

नेमकं घडलं तरी काय?

खेकड्याला खूप खाज असते. खेकडा जेव्हा खायचा असतो तेव्हा त्याची खाज उतरावी लागते म्हणजे ती खाज आपल्याला येत नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी धाराशिवमध्ये सावंतांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. अधिवेशनात भाषण करत असताना ते काय बोलतात हेच कळत नाही. कोरोना काळात ते आरोग्यमंत्री नव्हते या गोष्टीचं समाधान आहे. ते जर कोरोना काळात मंत्री असते. बाबा.. बा.. बा.. काय झालं असतं, अशी खोचक टीकाही केली होती.

सावंतांचाही पलटवार

परवा बारामतीचं पॅकेज इथं आलं होतं. ते म्हणाले आपल्या खात्याचं बघा, दुसऱ्या खात्याचं बघू नको. का अख्खा महाराष्ट्र विकत घ्यायचाय का, आपलं वय किती, आपण बोलतो किती, माझ्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी ऐकून घेतलं. पण यापुढे जर तुमची अशीच भाषा राहिली तर तुम्हाला तितक्याच ठोकपणे उत्तर दिलं जाईल, हे तानाजी सावंतचे कार्यकर्ते आहेत हे लक्षात ठेवा असा इशारात सावंत यांनी रोहित पवारांना दिला.

मोदींकडे बोट दाखवण्याआधी स्वत:ची कारकीर्द तपासा; बावनकुळेंचं शरद पवारांना चोख प्रत्युत्तर

काकडेंनीही सावंतांना फटकारलं

उंची मोजायचीच झाली तर रोहित पवारांची बौद्धिक पातळी निश्चितच उंच आहे. शारीरीक उंची मोजायची झाली तर डॉक्टरसाहेब तुमच्यापेक्षा रोहित पवारांची उंची जास्तच आहे. कोणाच्या शरीरावर, व्यंगावर किंवा अन्य गोष्टींवर टीका करणे म्हणजे स्वतःचे अपयश झाकून ठेवण्यासारखं आहे हे लक्षात घ्या, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी सावंतांना उत्तर दिले.

Exit mobile version