दुपारपर्यंत ‘रास्तारोको’, नंतर ‘धरणे’ द्या, उद्या आंतरवालीत बैठक; जरांगेंचं समाजबांधवांना आवाहन

Manoj Jarange : राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक (Maratha Reservation) अधिवेशनात मंजूर करून घेतले आहे. मात्र, सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. परंतु, राज्यात सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आंदोलनाच्या […]

..तर विधानसभेला 288 उमेदवार उभे करणार; उपोषण सुरू करताच जरांगेंचा सरकारला इशारा

..तर विधानसभेला 288 उमेदवार उभे करणार; उपोषण सुरू करताच जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange : राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक (Maratha Reservation) अधिवेशनात मंजूर करून घेतले आहे. मात्र, सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. परंतु, राज्यात सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आंदोलनाच्या स्वरूपात थोडा बदल करण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात तीन राजे मात्र एकानेही दया दाखवली नाही. आज गावागावात होणारे रास्तारोको शांततेत करा. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेतच आंदोलन करा. सायंकाळी 4 ते 7 आंदोलन करू नका. उद्यापासून रास्तारोको होणार नाही. 25 फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार असून समाजबांधवांशी मला महत्वाचं बोलायचं आहे. आज संध्याकाळी रास्तारोकोचे रुपांतर धरणे आंदोलनात करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केले.

Maratha Reservation : आंदोलनाआधी पोलीस अलर्ट; मराठा कार्यकर्त्यांना बजावल्या नोटीसा

आज सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेतच रास्ता रोको करा. विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या तर त्यांना रस्ता द्या किंवा त्यांना परीक्षा केंद्रावर नेऊन सोडा. 1 वाजल्यानंतर ग्रामपंचायतीसमोर किंवा मंदिरासमोर या रास्तारोकोचं रुपांतर धरणे आंदोलनात करा. शहरातील तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करा. आंदोलनात अचानक बदल का करण्यात आला असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर जरांगे पाटील म्हणाले, आम्ही आमच्या आंदोलनात फक्त एकच बदल केला आहे तो म्हणजे रास्तारोकोचे रुपांतर धरणे आंदोलनात केला आहे. आम्ही काही भावनाशून्य नाही. कुणाला काही त्रास होणार नाही असाच आमचा उद्देश आहे.

आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आपल्याला पेपरला जाताना काही अडचण येते का असा प्रश्न त्यांच्या मनात आहे. तेव्हा सामाजिक हित लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना काही अडचण येऊ नये. आपलं लेकरू परीक्षेला मुकलं तर आपल्याला कसं वाटेल, इतरांमध्ये आपलं लेकरू बघायला नको का, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन आंदोलनात थोडा बदल केल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

Manoj jarange आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? स्पष्टीकरण मागत हायकोर्टाचा सवाल

उद्या आंतरवाली सराटीत समाजाची मोठी बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. मला समाजबांधवांशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी या बैठकीला उपस्थित राहावं असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. आता जरांगे पाटील या बैठकीत काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version