Download App

‘समृद्धी’नंतर मराठवाड्याचे भाग्य उजळणार; फडणवीसांची परभणीत मोठी घोषणा

Devendra Fadnavis : समृद्धी महामार्गामुळे मोठं परिवर्तन आपल्याला दिसतंय. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग करतोय यातून मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचं भाग्य उजळणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा निधी दिला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. परभणीत आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, आमचे विरोधक नुसतेच टीका करतात. एक भोंगा सकाळीच सुरू होतो. तर रात्री 10 वाजेपर्यंत दुसरे भोंगे सुरू असतात. माझा यांना सवाल आहे. आमच्यावर पाहिजे तेवढी टीका करा आम्ही टिकेला घाबरत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. पण माझं एकच म्हणण आहे. मी सुद्धा विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षनेता होतो. वर्षानुवर्षे विरोधी पक्षात काम केलं.

‘BRS’ चा भाजपला दणका! सोलापुरात पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत धरली हैदराबादची वाट

ज्यावेळी सरकारवर टीका करायचो त्यावेळी चांगलं काय झालं पाहिजे हे देखील सांगायचो. ते मात्र यांच्याकडं सांगण्यासारखं काहीच नाही. कुठली दिशा असली पाहिजे हे सांगू शकत नाही. काय केलं पाहिजे हे सांगू शकत नाही. पण यांच्यातला एकही नेता विकासावर एकही शब्द बोलत नाही. अरे तुमच्या भाषणांनी गरीबी दूर होणार नाही. तुमच्या भाषणांनी शेतमजुरांच्या पोटात दोन घास जाणार नाहीत. परिवर्तनात सामील व्हा. बोटं दाखवू नका. आम्ही तुमच्या परिवर्तनासाठी उतरलो आहोत परिवर्तन करून दाखविल्याशिवाय आम्ही तिघं स्वस्थ बसणार नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

 

परभणीत साडेआठ लाख लोकांना लाभ दिला. 1500 कोटी रुपयांच्या योजना जिल्ह्यात पोहोचल्या. आज पाऊस नाही. सरकारचंही लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार उभं राहिल काळजी करू नका. मराठवाड्याला दर 4 वर्षानी अशाच दुष्काळाचा सामना करावा लागतो. दुष्काळमुक्त करण्यासाठी दोन योजना तयार केल्या. मराठवाडा ग्रीडच्या कामासाठी 20 हजार कोटींची मागणी केंद्राकडे केली. सरकार पैसे नक्कीच देईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘अजितदादा काल खरं तेच बोलले’; वडेट्टीवारांच्या इशाऱ्यामागचं पॉलिटिक्स काय?

जलयुक्तचा फायदा शेतकरी घेतात बागायती पिके

जलयुक्त शिवार योजनेतून मराठवाड्यात चांगली कामे झाली. शेतकरी येथे बागायती पिके घेत आहेत. हे या योजनेचे मोठे यश आहे. आता जलयुक्त शिवार 2 सुरू केली आहे. समृद्धी महामार्गामुळे मोठं परिवर्तन आपल्याला दिसतंय. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग करतोय यातून मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचं भाग्य उजळणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा निधी दिला.

परभणीतील रस्ते खराब काँक्रिटेचेच करून टाका

परभणी शहरातील रस्ते जरा खराब आहेत. काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर दूर उतरवलं. प्रशासनाला वाटलं येथील खराब रस्ते मुख्यमंत्र्यांना दाखवू. पण मुख्यमंत्र्यांचं परभणीवर प्रेम आहे. मी विनंती करणार येथल्या मुख्य रस्त्यांन काँक्रिटचेच करा. परभणी जिल्ह्यातील 7 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी  एक रुपयात पीक विमा योजनेत नोंद केली. दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली. पुढील तीन वर्षात हे काम पूर्ण करणार. दहा लाख घरे ओबीसींसाठी बांधणार आहोत. जेवढी घरे मागणार तेवढी घरे देऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

follow us