‘BRS’ चा भाजपला दणका! सोलापुरात पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत धरली हैदराबादची वाट
Solpur Politics : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात चांगलेच हातपाय पसरले आहेत. नांदेडातून राज्यात एन्ट्री घेतलेल्या या पक्षाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडले आहेत. सोलापूर (Solapur Politics) जिल्ह्यातील पॉवरबाज नेते भगिरथ भालके यांना आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादीला धक्का दिल्यानंतर आता याच जिल्ह्यात भाजपला (BJP) खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप अल्पसंख्यक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून ते बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. जवळपास 25 पदाधिकाऱ्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता हे पदाधिकारी आजच बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. पदाधिकारी काल रात्रीच हैदराबादला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत.
मुघलांचे गुलाम आज महाराष्ट्राला हिंदुत्व शिकवत आहेत : लव्ह जिहादवरुन राऊतांचा भाजपवर निशाणा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरात मोठी सभा घेतली होती. या सभेतच पंढरपुरातील नेते भगिरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. केसीआर यांच्या या दौऱ्याची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. जवळपास सहाशे गाड्यांचा ताफा घेऊन राव पंढरपुरात दाखल झाले होते. फक्त सोलापूर जिल्हाच नाही तर नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या जिल्ह्यांतही भारत राष्ट्र समितीने दिग्गज नेते आपल्या पक्षात घेतले आहेत. त्यामुे आगामी काळातील निवडणुकात बीआरएसकडेही आता आव्हान म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.