मुघलांचे गुलाम आज महाराष्ट्राला हिंदुत्व शिकवत आहेत : लव्ह जिहादवरुन राऊतांचा भाजपवर निशाणा
मुंबई : भाजपच्या वाशिंग मशीनमधून भ्रष्टाचाराचे डाग स्वच्छ करून मिळतात तसं हिंदुत्वाच्या बाबतीतही घडत आहे. अजित पवारांसारखे लोकं एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले. शिंदेंसोबतचे आमदार उद्या संघ शाखांवर जाऊन कसरती करतील. पण हिंदुत्वावर घाव घालणारे सर्व लोक भाजपात आले तसे ज्यांचे पूर्वज आणि घराणी मोगलांच्या चाकरीत धन्यता मानत होते त्यांचे आजचे वंशज भाजपच्या पखाली वाहताना दिसत आहेत. यापैकी अनेकांना भाजपने खासदार, आमदार म्हणून निवडून आणले आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. (Sanjay Raut commented on BJP’s stance on love jihad from Saamna’s Rokh-Thok)
सामनाच्या रोख-ठोक या सदरामधून संजय राऊत यांनी भाजपच्या लव्ह जिहादवरील भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘लव्ह जिहाद’ हा लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचाराचा मुद्दा असेल, पण भाजपात आज असे अनेक लोक आहेत ज्यांच्या पूर्वजांनी मोगलांना आपल्या लेकीबाळी दिल्या. भाजपने नुसता खिसा साफ केला तरी असे शंभरावर बाटगे मोगल पडतील.ही सर्व घराणी आज भाजपबरोबर आहेत आणि ते महाराष्ट्राला हिंदुत्व वगैरे शिकवत आहेत. पुन्हा ‘लव्ह जिहाद’ वगैरे विषय जोडीला आहेतच.
बारामतीत अजित पवारांची फटकेबाजी; पण शरद पवार, सुप्रिया सुळेंवर शब्दही नाही
महुआ मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. संसदेत त्या जोरदार भाषण करतात. त्यांचे भाषण ऐकून मोदींसह संपूर्ण भाजपचा रक्तदाब वाढतो. त्यांनी सांगितले, “2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी देशभरात दंगली घडवल्या जातील. अयोध्येत राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात देशभरातून विशेष ट्रेन सोडल्या जातील आणि त्यातील ट्रेनवर मुस्लिमांच्या गावांतून हल्ले घडवले जातील. त्यांना पुन्हा ‘गोध्रा’ करायचे आहे.” महुआ मोईत्रा यांनी जे सांगितले ते गंभीरच आहे, असेही राऊत म्हणाले.
सोनिया गांधी, राहुल गांधी सुट्टीसाठी जम्मू कश्मीरला; श्रीनगरच्या निगेन तलावात लुटला नौकाविहाराचा आनंद
सनी देओलची रद्द झालेली नोटीस अन् नितीन देसाईंची आत्महत्या
यावेळी राऊत यांनी भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओलची रद्द करण्यात आलेली कर्ज वसुलीची नोटीस आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या यावरुनही भाजपवर निशाणा साधला. एका बाजूला रिझर्व्ह बँकेला वेठीस धरून आपापल्या लोकांची हजारो कोटींची कर्जे माफ करायची आणि एखाद्या मराठी नितीन देसाईला आत्महत्येस प्रवृत्त करायचा, हे सर्व सुरु आहे, असे म्हणत त्यांनी भाजपला लक्ष्य केले.