Download App

‘आधी बाळासाहेबांच्या नावाने दुकानदाऱ्या चालवल्या आता’.. शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Sanjay Shirsat News : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून त्यांनी पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा गदारोळ शांत होत नसल्याचे पाहत चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. याबाबत आपण स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आता या वादात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उडी घेतली आहे.

शिरसाट म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य वैयक्तिक आहे. कुणाच्या बाजूने आहे असे मला वाटत नाही. पण राम मंदिर उभारणी किंवा बाबरी पाडणे हे आंदोलन सर्व हिंदू धर्मियांचे होते. त्याठिकाणी कोण्या पक्षाचे बॅनर किंवा झेंडा नव्हता.’

जेपीसीच्या मागणीवरून शरद पवारांचे घुमजाव! म्हणाले…

‘ज्यावेळी बाबरीचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी ढाचा पाडला असेल तर मला त्याचा अभिमान आहे. त्या आंदोलनाच्या वेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.’

‘आज जे म्हणत आहेत की बाळासाहेबांचा अपमान झाला तर बाळासाहेबांचा अपमान करण्याची हिंमत कुणातच नाही. संजय राऊत यांनी वक्तव्य केले होते की तुम्ही त्यांची नाडी धरुन गेला होतात का ?’, त्यावरही शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

चंद्रकांत पाटलांना मनसेनं फटकारलं; दाखवला ‘तो’ व्हिडीओ

ते म्हणाले, ‘तुमची अवस्था विना नाड्याच्या पायजम्यासारखी झाली आहे. तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या नावाने दुकानदाऱ्या चालवल्या आता टाळ्या वाजवत बसा. स्वाभिमानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका.’

तुम्हाला शरम वाटली पाहिजे

‘बाळासाहेबांनी सांगितले होते की राष्ट्रवादीत जाऊ नका. पण तुम्ही गेलात. त्यामुळे सगळ्यात मोठे दोषी आणि गुन्हेगार तुम्ही आहात. हेच उद्धव ठाकरे आधी म्हणत होते की राहुल गांधी चोर आहेत. आता ते काय  तुम्हाला संत दिसत आहेत का, त्यांच्या मांडीवर जाऊन बसले ते काय तुम्हाला संत दिसतात का ?’, असा सवाल शिरसाट यांनी केला.

Tags

follow us