Download App

Maharashtra Rain : पावसाने पिके झाली आडवी, हताश शेतकऱ्याने घेतले तोंड झोडून..

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकांचे डोळ्यांदेखत नुकसान होत असताना पाऊस शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने तर पिकांचे नुकसान पाहून स्वतःचेच तोंड झोडून घेतले आहे.

मागील दोन दिवसांपासून राज्यभर ढगाळ वातावरण आहे. काही भागात जोरदार पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाला. छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar)जिल्ह्यातील ग्रामीण भागालाही या अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.

हे वाचा : Unseasonal Rain विजा, गारांसह राज्यात वादळी पाऊस!

सोसाट्याचा वारा आणि पावसाने पिके भुईसपाट झाली आहेत. गंगापूर (Gangapur) तालुक्यालाही मोठा फटका बसला आहे. गहू, हरभर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने काळजी वाढली आहे.

Unseasonal Rain : महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज

शेतातील आडवी पिके पाहून मात्र शेतकरी हताश झाले आहेत. हजारो रुपये खर्च करून मोठी काळजी घेऊन उभी राहिलेली पिके एकाच पावसात आडवी झाली. एका शेतकऱ्याने सकाळी बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. पिकांची ही अवस्था पाहून शेतकऱ्याने तिथेच स्वतःचे तोंड झोडून घेतले.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात सहा ते नऊ तारखेपर्यंत अवकाळी पाऊस होईल. त्यानुसार सोमवारपासून अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पिकांसाठी नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठविणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले आहे.

Tags

follow us