Unseasonal Rain विजा, गारांसह राज्यात वादळी पाऊस!

Unseasonal Rain विजा, गारांसह राज्यात वादळी पाऊस!

पुणे : पुणे (Pune District) जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यासह राज्यातील अहमदनगर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद (Aurangabad), बुलढाणा आणि जालना (Jalna) या जिल्ह्यातील काही भागात पुढील तीन तास विजांचा कडकडाटा, गारांसह वादळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने (India Meteorological Department) केले आहे.

हवामान विभागाने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ५ ते ८ मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. ७ मार्चला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता देखील वर्तवली आहे. तर याच काळात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.

Holi Celebration : ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा देत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने शिमगा!

सोमवारी होळी सणाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान पुणे शहर आणि उपनगरात ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर शहराच्या मध्य वस्तीतील शनिवार वाडा, कसबा पेठ परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात काही ठिकाणी वादळी वारे, पावसासह गारपीट झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube