Download App

Manoj jarange : छगन भुजबळांच्या पोटातलं ओठावर आलं; जरांगे पाटलांचा भुजबळांवर घणाघात

Manoj jarange On Chagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal)यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange)यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर भुजबळांनी मराठा आंदोलकांनी बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी (Prakash Solanki)यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar)यांच्या घरांवर हल्ला केला. त्यावरुन गृहविभाचीही लख्तरं काढली. तसेच मनोज जरांगेंची भेट घेणाऱ्या माजी न्यायमूर्तींवर भुजबळांनी टीका केली, त्यावरुन जरांगे पाटील यांनी मंत्री भुजबळांवर घणाघात केला आहे.

Pune : अनैतिक संबंध उघड करण्याची तरुणाला धमकी : महिलेकडून 20 लाखांच्या खंडणीची मागणी

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही तर आमचा जीव वाचवायला आला नाही, पण जे न्यायमूर्ती जीव वाचवायला आले, त्यांच्याबद्दल देखील छगन भुजबळ यांनी खालच्या पातळीवर बोलायला सुरूवात केली.

BMC अन् शिंदे सरकारला हायकोर्टाचा दणका : मुंबईत सर्व बांधकामांवर बंदी, फटक्यांबाबतही इशारा

ते म्हणाले की, मराठा समाज जास्त काही मागत नाही, आपल्या हक्काचं बोलत आहे. मनोज जरांगेंची भेट घेणाऱ्या माजी न्यायमूर्तींवर भुजबळांनी टीका केली होती, त्याला जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं.

बीडमधील हिंसाचाराचं आम्ही समर्थन करत नाही, मराठा आंदोलनाला गालबोट लागण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही यावेळी जरांगे पाटील यांनी केला. मराठ्यांना कुणबी आरक्षण दिल्यामुळं ओबीसींचं आरक्षण कसं संपणार? असाही प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. जे मराठा समाजाच्या हक्काचं आहे ते आम्ही मागत आहोत असंही जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले की, माणसानं भानावर राहून बोललं पाहिजे. आता तर ते खूपच खालचं बोलायला लागले आहेत. न्यायदानाचं काम हे न्यायाधीश करतात. त्यांनी जीव वाचवण्याचं काम केलं. जीव वाचवण्यासाठी तुम्ही तर येत नाही, तुम्ही तर जीव घ्यायला निघाला. पण जे आलेत त्यांच्यावर असे बोलत असाल तर काय बोलणार? असंही जरांगे पाटील म्हणाले.

जालन्यात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावर भुजबळांनी पोलिसांची बाजू घेऊन आपल्यावर टीका केली. मी तर म्हणतोय की याची सखोल चौकशी करा. तुम्ही जे बोलताय ते खरं असेल तर तुमच्या सरकारकडून चौकशी करा. जे या प्रकरणात बडतर्फ व्हायला पाहिजे होते, ते बाजूलाच राहिलेत आणि कारवाई दुसऱ्या पोलिसांवरच केली.

Tags

follow us