Download App

Manoj Jarange : पाच अटी अन् 12 ऑक्टोबरला विराट सभा; जरांगे पाटील काय म्हणाले?

  • Written By: Last Updated:

जालना : गेल्या 15 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकार ठोस निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा अवधी देत येत्या 12 ऑक्टोबरला मराठ्यांची विराट सभेची घोषणा केली आहे. सरकारला महिनाभराचा वेळ देतान जरागेंनी काही अटीदेखील दिल्या आहेत.(Jalna Maratha Protest Update)

शासन आपल्या दारी कार्यक्रमाने पोटदुखी, लवकरच डॉक्टर आपल्या दारी; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर घणाघात

जात बदनाम होऊ नये, म्हणून दोन पावले मागे येत असल्याचे सांगत मी उपोषण सोडण्यास तयार आहे. मात्र, जागा सोडण्यास तयार नाही. मराठा समाजाने एका महिन्याचा वेळ दिला असून, वेळजरी दिला असेल तरी, राज्यभरात अहिंसक आंदोलन करा असे आवाहन जरांगे यांच्याकडून समाजातील नागरिकांना करण्यात आले आहे. समितीचा अहवाल कसाही आला तरी ३१ व्या दिवशी मराठा समाजातील सर्वांना जात प्रमाणपत्र द्यायचे असेही जरांगे यांनी राज्य सरकारला सांगितले आहे.

जरांगे पाटलांच्या अटी काय?
सरकारला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ देताना पाच अटी टाकल्या आहेत. यात प्रामुख्याने समितीचा अहवाल कसाही येवो आरक्षण द्यावे लागेल. महाराष्ट्रात आंदोलकांवर जेवढे गुन्हे दाखल तेवढे मागे घेणे. लाठीचार्ज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करा. उपोषण सोडायला, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे आले पाहिजे अशा प्रमुख अटी देण्यात आल्या आहेत.

Manoj Jarange : ..तर एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही; जरांगेंचा खणखणीत इशारा

फडणवीस बेईमानी करणार नाही – संभाजी भिडे

जरांगे पाटलांच्या नव्या भूमिकेपूर्वी उपोषणस्थळी संभाजी भिडेंनी (Sambhaji Bhide) जरांगे पाटलांची भेट घेत लढा थांबवू नका उपोषण थांबवा असा सल्ला दिला. तसेच पुढील जबाबदारी माझ्यावर टाकावी असेदेखील भिडे गुरूजींनी जरांगे पाटलांना सांगितले आहे.

रांगेंच्या लढ्याला 100 टक्के यश मिळेल असे म्हणत त्यांचे उपोषण योग्य आणि सुत्य असल्याचे भिडे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे बेईमानी करणार नाही, असे म्हणत शिंदे आणि फडणवीस लबाडी करणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सरकारमधील तिनही नेते म्हणजे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार धुरंधर असून हवे ते मिळवून देण्याची जबाबदारी आपल्याला द्यावी असे भिंडेंनी जरांगेंना सांगितले आहे.

मी देखील वाभाडे काढायला कमी पडणार नाही, जळगावच्या सभेतून अजित पवारांचा इशारा

अजित पवार काळजी करणारा माणूस 

जरांगेंच्या भेटीदरम्यान भिडेंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाही. तर, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जरी राष्ट्रवादीचे असले तरी, ते काळजी करणारे असल्याचे माझे मत आहे. त्यामुळे तुमच्या लढ्याला नक्कीच यश येईल असेा विश्वास व्यक्त करत उगीच ते राजकारणी आहेत म्हणून भीती बाळगू नका. मागच्या अनेक दिवसात एवढ्या चांगल्या नेतृत्वाचं सरकार राज्यात नव्हतं. ते आता आलेलं आहे. ही माणसं शब्द पाळतील, यावर माझा विश्वास आहे.

Tags

follow us