Manoj Jarange Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात जाऊन मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगरमधील चांगल्या दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासा सांगितले. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी तब्बल 16 दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एवढ्या दिवसांच्या उपवासानंतर मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्याना उपचारासाठी अंतरवाली सराटी येथून रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
R Ashwin Birthday Special : आधी सलामीवीर, नंतर वेगवान गोलंदाज आणि शेवटी फिरकीत नाव कमावले
छत्रपतीत संभाजीनगरमध्ये जात असताना ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचं मराठा समाजाकडून स्वागत करण्यात आलं. या हॉस्पीटलमध्ये जरांगे यांच्या चाचण्या आणि उपचार केले जाणार आहेत. उपचार घेण्याबद्दल आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. उपचार घेतल्यानंतर आपण पुन्हा उपोषणस्थळी जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
‘त्यांना’ नामांतराच्या निर्णयाचा अधिकार होता का? CM शिंदेंचा ठाकरेंना थेट सवाल
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आज अधिकच खालावली आहे. त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे जरांगे पाटील यांना रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगरला नेण्यात आले. गॅलेक्सी हॉस्पीटलजवळ रुग्णवाहिका येताच असंख्य मराठा आंदोलकांनी गराडा घातला. यावेळी उपस्थितांनी जरांगे पाटील यांच्या नावाने घोषणा दिल्या.
उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांच्या चाचण्या हॉस्पीटलमध्ये केल्या जाणार आहेत. त्यांच्या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार केले जाणार आहेत.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला 17 दिवस पूर्ण झाले. शरीराच्या तपासण्या करणं गरजेचं असल्याचं जिल्हा प्रशासन आणि सरकारचं म्हणणं नाही. मराठा समाजाचं देखील म्हणणं तेच होतं. त्यामुळे गॅलेक्सी हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलो असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.