‘त्यांना’ नामांतराच्या निर्णयाचा अधिकार होता का? CM शिंदेंचा ठाकरेंना थेट सवाल
Eknath Shinde : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. येथील शासकीय कार्यक्रम पार पडल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना थेट सवाल करत टीका केली. मुख्यमंत्री म्हणाले, काल आपण छत्रपती संभाजीनगर येथे कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी या भागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी 45 हजार कोटींच्या योजनांची घोषणा केली. वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवून येथील पाण्याचा दुष्काळ कमी करण्यासाठी योजना तयार केल्या आहेत. मराठवाड्याच दुष्काळ आगामी काळात संपवू.
PM Narendra Modi B’day : पंचाहात्तरीच्या उंबरठ्यावर पोहचलेले मोदी राजकारणातून निवृत्त होणार?
यानंतर शिंदेंनी राज्य सरकारने कालच घेतलेल्या जिल्ह्यांच्या नामांतराच्या निर्णयावरून महाविकास आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिंदे म्हणाले, काल मी बातम्या पाहिल्या. त्यात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे जिल्ह्यांचे नामकरण आम्ही केलं असं काही जण म्हणत आहेत. मात्र, महायुतीचे सरकार आल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला. यासाठी केंद्र सरकारकडेही सातत्याने पाठपुरावा करत कायदेशीर पूर्ततेसाठी प्रयत्न केले.
आज मात्र काही लोकं सांगत आहेत की आमच्या सरकारच्या काळात आम्ही कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेतला. परंतु, अशी कॅबिनेट घेण्याचा अधिकार तुम्हाला होता का?सरकार अल्पमतात आलेले असताना अशा प्रकारचे निर्णय घेता येत नाहीत, ते बेकायदेशीर असतात. मुळात त्यांना कॅबिनेट बैठक घेण्याचा अधिकार राहिला होता का?, ते तेव्हा अल्पमतात होते. मात्र, जेव्हा सत्तेतील पहिले अडीच वर्षे होते तेव्हा हात बांधून का बसले होते? असा सवाल करत आमच्या सरकारने अधिकृतरित्या शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादीच्या बैलांना शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका, नाहीतर.. ऊस निर्यातबंदीवर सदाभाऊंचा संताप
स्वामी रामानंद तीर्थ यांचा दिल्लीत पुतळा
मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान, त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहरातील वंदे मातरम् सभागृहात महापालिकेच्या 457 कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली.