Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतेवेळी त्यांचा हातही थरथरत होता. उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज किंवा उद्या चर्चेसाठी यावं. सरकारशी अद्याप कोणताच संवाद झालेला नाही. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळालेली नाहीत. दोन दिवसांत आरक्षण मिळेल असे जर तानाजी सावंत म्हणत असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे का म्हणत नाहीत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
फडणवीसांच्या कानात बोळे घातले आहेत का ?
प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर चर्चा होत नसते समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाहीत. फडणवीसांच्या कानात काय बोळे घातले आहेत का? असा सवाल करत आरक्षण द्यायचे की नाही एकदाच काय ते सांगून टाकायचे बाकीची वळवळ करायची नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार पडणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भाजपाच्या मनातलं
सरकारचं कोणतंही उत्तर मिळालं नाही अथवा संवाद नाही. 30-31 ऑक्टोबरपर्यंत आम्ही वाट पाहू. सरकारला माणुसकी समजत नाही आम्ही त्यांना उत्तर देऊ, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. सरकारने आमच्या लेकराबाळांचा विचार करावा. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावं. मी आधी माझ्या समाजाचा आहे नंतर कुटुंबाचा आहे. सरकारने वेळ वाया न घालवता तत्काळ आरक्षण द्यावं. आपल्याला आरक्षण मिळणार आहे तेव्हा गडबड करू नका असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
जरागेंना सरकार भेटणार का?
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आज पुण्यात होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना सरकारकडून कुणी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी कुणीच गेलं नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर देसाई म्हणाले, जरांगे पाटील यांनी ज्यावेळी उपोषण सुरू केले होते तेव्हाच गिरीश महाजन यांनी त्यांना फोन केला होता. मात्र त्यावेळी आमच्या गावात कुणीही पुढारी येऊ नका असे ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी कुणीच गेले नाही. आता मनोज जरांगे पाटील म्हणत असतील सरकार चर्चेसाठी तयार आहे. आम्ही एकदा नाही तर शंभर वेळेस जाऊन त्यांची भेट घेऊ असे शंभूराज देसाई म्हणाले.
मराठा समाजासाठी योगदान काय ते एकदा जाहीर करा? विखेंचे थेट शरद पवारांना ‘चॅलेंज’