Download App

‘मला दारू शिवली असेल तर, मी जिवंत समाधी घेतो,…’; भुजबळांच्या आरोपाला जरांगेंचा पलटवार

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटलेला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला 24 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला असून, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मात्र, जरांगेंनी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केल्यानं मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि जरांगेपाटीलांमध्ये जहरी टिका केली जात आहे. काल (दि.17) भिंवडीतील ओबीसी एल्गार मेळाव्यातूनही भुजबळांनी जरांगेंवर सडकून टीका केली. यावेळी भुजबळांनी बेवडा, पिऊन पिऊन तुझ्या किडन्या खराब झाल्या आहेत त्या आधी सांभाळ अशी टीका केली होती. भुजबळांच्या या जहरी टीकेला आता जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जन्मापासून ते आतापर्यंत दारू माझ्या अंगाला शिवली असेल किंवा दारूचा स्पर्श जरी झाला असेल तर, मी जिवंत समाधी घेतो आणि दारूला स्पर्श केला नसेल तर भुजबळांनी समाधी घ्यावी, असं प्रत्युत्तर जरांगेंनी भुजबळांना दिले आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्र गारठला, पुढील दोन दिवस ‘या’; ठिकाणी पावसाची शक्यता, IMD चा इशारा 

छगन भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले होते, मी स्वत: आरक्षण घेतले नाही, माझ्या मुलांनीही आरक्षण घेतले नाही. याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता जरांगे म्हणाले की, तू नको घेऊ, आम्हाला काय करायचं त्याचं? पण, सगळ्या बारीक-सारीक जातीचं खातो ना, आरक्षण घेऊन काय करतो? जाऊ दे, मी मंत्री गिरीश महाजनांना शब्द दिलाय की, आम्ही भुजबळांविरोधात बोलायचं नाही, त्यांनी आमच्या विरोधात बोलू नाही. पण, हा बोलतोच. आता महाजन साहेबांनी त्याच्याकडे बघाव, असं जरांगे म्हणाले.

ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजरांचे पाय आणखी खोलात; एसआयटीच्या चौकशी आधीच एसीबीची धडक ! 

भुजबळांनी जरांगे पाटलांवर बेवडा अशी टीका केली. याविषयी विचारले असता जरांगे म्हणाले, मी याच्यामुळेच त्याला येडपड म्हणतो. खास यडपट. येवल्यात बसून सासूच्या घरचं खातो, त्यामुळं येडपट म्हणतो. जन्मापासून ते आतापर्यंत दारू माझ्या अंगाला शिवली असेल किंवा दारूचा स्पर्श जरी झाला असेल तर, मी जिवंत समाधी घेतो. मात्र, दारूला स्पर्श केला नसेल तर, आरोप करणाऱ्यांनी समाधी घ्यावी असे म्हणत जरांगेंनी भुजबळांना ओपन चॅलेंज दिले. हे मी अत्यंत जबाबदारीने बोलत असून, खोटं वाटतं असेल तर, माझी नार्कोटेस्ट करा असेही जरांगे म्हणाले.

जरांगे पुढे म्हणाले, तो अतिशय जातिवादी आहे, हो मुर्खांचा मुकादम आहे. महामुर्ख माणूस आहे. मी त्याला येडपट त्यामुळंच म्हणतो. जन्मापासून आपल्या शरीराला दारूचा डाग नाही. लोकांसाठी लढून हे शरीर असं झाले आहे. तुझ्या सारखं लोकांचं रक्त पिऊन शरीर वाढलेलं नाही. माकट काय करू शकतो, ते रावणाला विचार. तुझीही लंका जळेल, जरा नीट राहा, असं जरांगे म्हणाले.

Tags

follow us