ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजरांचे पाय आणखी खोलात; एसआयटीच्या चौकशी आधीच एसीबीची धडक !

  • Written By: Published:
ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजरांचे पाय आणखी खोलात; एसआयटीच्या चौकशी आधीच एसीबीची धडक !

नाशिक: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजरांच्या (Sudhakar Badgujar) अडचणीत आता आणखी भर पडलीय. बडगुजर यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टी केल्याचा आरोपीचा एसआयटी चौकशी होणार आहे. पण त्यापूर्वीच महानगरपालिकेतील एका जुन्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात आज गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी एक पथक त्यांच्या घरी चौकशीसाठी गेल्याचे वृत्त आहे.

कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा देवाचा निर्णय नाही; महबुबा मुफ्तीची आगपाखड !

ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टी केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्या पार्टीचे काही फोटोही समोर आले होते. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेला एक दिवस होत नाही तो बडगुजर हे आता जुन्या प्रकरणात अडचणीत आले आहेत.

बडगुजर हे नगरसेवक व अन्य पदावर असताना त्यांनी आपल्या कंपनीमार्फत महापालिकेची कामे घेतली होती. त्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केले होते. त्यामुळे महापालिकेची फसवणूक झाल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला आहे. सुधारकर बडगुजर यांच्यासह साहेबराव शिंदे, सुरेश चव्हाण या तिघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


‘देवेंद्र फडणवीसांनी मिठाचा खडा टाकू नये’; पवारांवर टीका, अमोल कोल्हेंनी सुनावलं

काय आहे प्रकरण ?
महानगरपालिकेची फसवणूकप्रकरणी तत्कालीन आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याचे काही कागदपत्रेही एसीबीला दिले होते. त्या आधारे एसीबी माजी नगरसेवक बडगुजर यांची चौकशी सुरू केली होती. यात बडगुजर यांनी बडगुजर अॅण्ड बडगुजर कंपनीतून 2006 मध्ये निवृत्ती घेतल्याचे बनावट कागदपत्रे तयार केली होती. त्यानंतर 2007 पासून ते नगरसेवक व अन्य पदे भूषवत होते. बडगुजर यांच्या कंपनीने महापालिकेचे विविध कंत्राटे घेऊन 34 लाख रुपये स्वीकारून आपल्या फायदा उठविला होता, असे चौकशीत समोर आले होते. त्यामुळे आता या जुन्या प्रकरणात एसीबीने चौकशी सुरू केली आहे. रविवारी रात्री एक पथक त्यांच्या घरीही दाखल झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज