कलम 370 वरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय अल्लाहचा निर्णय नाही; मेहबुबा मुफ्तीची आगपाखड!

  • Written By: Published:
कलम 370 वरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय अल्लाहचा निर्णय नाही; मेहबुबा मुफ्तीची आगपाखड!

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 (Artical 370) हटविण्याचा मोदी सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. यावर पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी संतापून एक विधान केले आहे. कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अल्लाहचा निर्णय नाही. माझा पक्ष जम्मू-कश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळविण्यासाठी संघर्ष करत राहणार असल्याचे विधान पीडीपी पक्षाच्या अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे.

‘बेवडा, पिऊन तुझ्या किडन्या किडल्यात त्या सांभाळ’; एकेरी उल्लेख करत भुजबळांचा हल्लाबोल

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा कलम 370 मोदी सरकारने रद्द ठरविले होते. या केंद्राचा निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने 11 डिसेंबर रोजी निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयानेही केंद्राचा निर्णयही योग्य ठरविला आहे. लवकरात लवकर राज्याचा दर्जा देऊन विधानसभा निवडणूक घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. यावर बोलताना मुफ्ती म्हणाल्या; आम्ही हिम्मत हरलेले नाही. आम्ही आमचा संघर्ष सुरूच ठेवणार आहे.

IND vs SA: टीम इंडियाला धक्का, इशान किशनही कसोटी मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला लागली ‘लॉटरी’

सर्वोच्च न्यायालय देव नाही. विधानसभेच्या शिफारशीशिवाय कलम 370 संशोधन केले जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सांगितलेले आहे. ते विद्वान न्यायाधीश होते. आज काही न्यायाधीशांनी निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे अल्लाहचा निर्णय नाही. हा निर्णय आम्ही मान्य करत नाही.

जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाला विरोध करणाऱ्या लोकांना वाटते आम्ही हार मानू. पण हे कलम पुन्हा लागू करण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमची लढाई सुरूच ठेवणार आहोत. आम्ही खूप बलिदान दिले आहेत. हे बलिदान आम्ही व्यर्थ जावू देणार नाही, असा इशाराही महबुबा मुफ्ती यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube