‘बेवडा, पिऊन तुझ्या किडन्या किडल्यात त्या सांभाळ’; एकेरी उल्लेख करत भुजबळांचा हल्लाबोल
Chagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil : मनोज जरांगेची दादागिरी सुरु, तू काय मला बघणार, बेवडा पिऊन-पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या सांभाळ, या शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरत जरांगेंच्या जाहीर सभा होत आहेत. या सभेतून मनोज जरांगे भुजबळांवर सडकून टीका करीत आहेत. याच टीकांना आज छगन भुजबळांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
विनायक मेटेंच्या कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर : बहिण आणि भाच्याविरोधात गुन्ह दाखल
छगन भुजबळ म्हणाले, मनोज जरांगेची दादागिरी वाढत चालली आहे. एवढी दादागिरी की जरांगेची बैठक आहे म्हणून कॉलेजला सुट्टीच जाहीर केली आहे, काय चाललंय? हा सांगतोयं आमच्या लेकरा-बाळांना सोडा लेकरं बाळं पिस्तुलं घेऊन फिरताहेत. तूझा कार्यक्रम करतो म्हणतोयं, तू काय मला बघणार तू तुझी तब्येत सांभाळ. बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडन्या सडल्या त्या सांभाळ, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
मला गोळ्या मारणार, फायरिंग करणार, वा रे वा….काय दादागिरी तुझी. आता दूध का दुध पाणी का पाणी हो जाये, कोण किती आहेत तेही समजले पाहिजे, त्यामुळे जातिनिहाय जणगनणा करा. सारथीला दिलं ते महाज्योतीला द्या. तुम्ही म्हणतात की 6 कोटी आहोत कुटून आणले रे 6 कोटी? असा सवालही छगन भुजबळांनी केला आहे.
लिबियातून युरोपात जाणारे जहाज बुडाले, 61 प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश
तसेच राज्यात ओबीसी 54 टक्के, 20 टक्के दलित आणि आदिवासी आणि 3 टक्के ब्राम्हण तर तुमचे 6 कोटी आले कुठून. केवळ 54 टक्के म्हटलं तरी साडेसात कोटी लोकं ओबीसी आहेत, दलित आदिवासी 20 टक्के म्हणजे दोन ते अडीच कोटी आहेत. मराठ्यांना कुणबी दाखले म्हणजे राजकीय आरक्षणही मिळणार आहे, त्यामुळे ओबीसींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला आहे.
काही लोकांना गावात प्रवेश तर काहींना बंदी :
आज दादागिरी वाढली आहे गावबंदी करत आहे. संविधान सांगतं की, तुम्हाला गावबंदी करता येत नाही. कायदा हातात घेतला तर शिक्षा होती. आम्हाला गावबंदी अन् काही लोकांना नाही रोहित पवारांचं स्वागत करता. तिथं बैठक घेता तिथं कोण काय बोललं तर तो रुग्णालयात अॅडमिट होतो, असंही भुजबळ म्हणाले आहेत.