विनायक मेटेंच्या कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर : बहिण आणि भाच्याविरोधात गुन्ह दाखल

विनायक मेटेंच्या कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर : बहिण आणि भाच्याविरोधात गुन्ह दाखल

पुणे : शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. वडिलोपार्जित फ्लॅट बळकावल्याचा आरोप विनायक मेटे यांचा मुलगा आशुतोष याने आत्या आणि त्यांचा मुलावर केला आहे. (Vinayak Mete’s son Ashutosh has accused father’s sister and his son of usurping father’s flat.)

या प्रकरणी आशुतोष मेटे याने विमानतळ पोलीस ठाण्यात विनायक मेटे यांची बहिण सत्वशीला महादेव जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश महादेव जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

‘चोऱ्या केल्या म्हणूनच पक्षातून हाकललं’; महाजनांनी खडसेंचं सगळचं सांगितलं

याबाबत अधिक माहिती अशी की, मेटे यांनी अपघाती निधनापूर्वी विमानतळ परिसरात गंगापूरम हाऊसिंग सोसायटी या इमारतीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. मात्र, हा फ्लॅट त्यांनी आपल्याला भेट म्हणून दिला आहे, असा दावा बहिण सत्वशीला महादेव जाधव आणि आकाश महादेव जाधव यांनी केला आहे.

Animal Movie Marathi Seen : आधी नकार नंतर होकार, उपेंद्रनं असा साकारला ‘अ‍ॅनिमल’चा ‘फ्रॅडी’ !

तर या फ्लॅटची सगळी कागदपत्रे हे विनायक मेटे यांच्या पत्नीच्या नावावर असून आरोपींनी अनधिकृतपणे लॉक तोडून घराचा ताबा घेतला आहे, असा आरोप मेटे यांचा मुलगा आशुतोष याने केला आहे. त्यानुसार दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube