लिबियातून युरोपात जाणारे जहाज बुडाले, 61 प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश
Libya Migrant Boat Sank : स्थलांतरितांना घेऊन जाणारे जहाज लिबियाच्या समुद्रात (Libyan Sea) बुडाल्याची भीषण दुर्घटना समोर आली. या जहाजातील सुमारे 61 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) ने याबाबतची माहिती दिली आहे. उंच लाटांमुळे बोट पाण्याने भरली आणि त्यामुळं 61 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. वृत्तानुसार, बोट समुद्राच्या जोरदार लाटांचा सामना करू शकली नाही आणि ती उलटली. (Libya Migrant Boat accident) मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
मोठी बातमी! मराठा आंदोलनाची घोषणा मनोज जरांगेंनी पुढं ढकलली, हे आहे कारण
2011 मध्ये नाटो समर्थित विद्रोह झाल्यानंतर लिबियामध्ये अशांतता आहे. यामुळे अनेक लोक हा देश सोडून युरोपात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भूमध्य समुद्र ओलांडून युरोपमध्ये जाण्यासाठी लिबिया हा मुख्य प्रवेश बिंदू आहे. आयओएमच्या म्हणण्यानुसार या वर्षात 2200 लोकांचा समुद्र पार करताना मृत्यू झाला आहे. यामुळे स्थलांतरासाठी हा जगातील सर्वात धोकादायक मार्ग बनला आहे. आताही याच मार्गाने ही प्रवासी बोट जात होती. मात्र, या जहाजाचा अपघात होऊन 61 जणांचा मृत्यू झाला.
सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन : लोकसभेपूर्वी PM मोदींचे गुजरातला सर्वात मोठे गिफ्ट
दरम्यान, एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, या अपघातातील सर्व पीडित हे नायजेरिया, गांबिया आणि इतर आफ्रिकन देशांतील आहेत. बचावलेल्या 25 जणांना लिबियातील एका केंद्रात नेण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
आयओएमच्या प्रवक्त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे, त्यात लिहिलं की, मृतांची संख्या पाहता समुद्रावार लोकांचे जीव वाचवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात नाहीयेत, हे स्पष्ट आहे.
जे या बोटीवर होते, ते युरोपात प्रवेश करण्यापूर्वी इटलीला जाण्याच्या बेतात होते. काही लोक तिथल्या असंतोषाला कंटाळून जात होते, तर काही कामाच्या शोधात होते.
दरम्यान, अपघात होण्याची ही पहिलीच घटना नाही आहे. याआधीही जून महिन्यात देखील अशाच प्रकारची दुर्घटना झाली होती. स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या जहाजातील सुमारे 79 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला होता. तर या जहाजातील शेकडो लोक बेपत्त झाले होते.