‘माझ्या पतीची फसवणूक, तो व्हिडिओ खोटा…’; सलीम कुत्ता प्रकरणावर हर्षा बडगुजरांची प्रतिक्रिया

  • Written By: Published:
‘माझ्या पतीची फसवणूक, तो व्हिडिओ खोटा…’; सलीम कुत्ता प्रकरणावर हर्षा बडगुजरांची प्रतिक्रिया

Harsha Badgujar : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितीश राणे आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भुसे यांनी केली. यावर आता सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर (Harsha Badgujar) यांनी भाष्य केलं.

ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला दीड लाख रुपये पगार 

राणेंनी बडगुजरांचा सलीम कुत्ता सोबतचा फोटो विधानसभेत दाखवला. यानंतर मंत्री दादा भुसे यांनी ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. दाऊद इब्राहिम हा देशाचा नंबर वन शत्रू आहे. सुधाकर बडगुजर यांनी देशद्रोह्यासोबत पार्टी केल्यानं त्यांची चौकशी झाली पाहिजे, बडगुजर हा छोटा मासा आहे. त्याच्यावर वरदहस्त आहे, असं भुसे म्हणाले होते. सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत विधानसभेत करण्यात आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. सलीम कुत्ता याच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पालकमंत्रिपद माझी वाट पाहतंय; गोगावले प्रचंड आशावादी, मंत्रिमंडळ विस्ताराची वेळही सांगितली 

हर्षा बडगुजर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ती क्लिप खोटी आहे. हा सार्वजनिक कार्यक्रम होता. त्यातला सलीम कुत्ता ही व्यक्ती कोण आहे, याबद्दल आम्हाला माहित नाही. बडगुजर हे नगरसेवक होते, त्यामुळे त्यांना कोणीही कार्यक्रमाला बोलवू शकतं. आणि कार्यक्रमाला बोलावल्यावर तर जावचं लागतं. अशावेळी त्यांनी कोणासोबत थोडं नाचलं-गायलं तर त्यामुळं त्याचा असा अर्थ होत नाहीह दोघेही मिळालेले आहेत.

त्या म्हणाल्या, आता दादा भुसेंनी काय पाहिलं माहित नाही. कदाचित त्यांना संपूर्ण प्रकरण माहित नव्हतं. डोळ्यांनी पाहणं आणि कानानं ऐकणं यात फरक असतो… त्यामुळं कोणीतरी काहीही तरी सांगितलं आणि भुसेंनी तसे आरोप केले, हे बरोबर नाही. माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, ते असे काहीही करू शकत नाही. लोक त्यांना चांगले ओळखतात, मी स्वतः त्यांना 33 वर्षांपासून ओळखते. असे आरोप तर गेल्या वेळी संजय राऊत यांच्यावरही अनेक आरोप झाले होते. त्यामुळे जे आरोप होतील, ते खरेच आहेत, असं नाही. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे, असं हर्षा बडगुजर म्हणाल्या.

माझ्या पतीची उघड-उघड फसवणूक केली जात आहे. त्यांचा यामागचा हेतू काय आहे, हे मी सांगू शकत नाही. हा व्हिडिओ तर आत्ताचा तर नाही आहे. हा कदाचित 15-16 वर्षांपूर्वीचा असेल, तेव्हा संपूर्ण शिवसेना एकत्रच होती, असंही बडगुजर यांनी म्हटलं.

सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया
भाजप महिला आघाडीच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी वेगळ्या विदर्भ राज्याला पाठिंबा दिला होता. शिवसेनेचा अखंड महाराष्ट्राला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही रहाटकरांच्या भूमिकेच्या विरोधात होतो. त्यांची नाशिकमधील सभा आम्ही उधळून लावली. त्यानंतर 2016 मध्ये माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मी 15 दिवस तुरुंगात होतो. बॉम्बस्फोटाचे आरोपीही तिथे होते. आम्हाला याची कल्पना नव्हती. माझ्या बाबतीत घडलेले प्रकरण राजकीय होते. त्यामुळे सलीम कुत्ता कोण आहे, तो काय करतो, कुठे राहतो हे आम्हाला माहीत नाही. माझा त्याच्याशी काही संबंध नाही.
सध्या दाखवल्या जात असलेला व्हिडिो मॉर्फ केलेला आहे, असं बडगुजर यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube