ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला दीड लाख रुपये पगार

  • Written By: Published:
ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला दीड लाख रुपये पगार

Thane mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेत (Thane mahanagarpalika) सातत्याने अनेक रिक्त पदांची भरती केली जाते. आताही एक नवीन भरती प्रक्रिया महानगरपालिका राबवत आहे. दरम्यान, तुमचं वैद्यकीय शिक्षण झालं असेल तर ठाणे महानगरपालिकेत तुम्हाला उत्तम पगाराच्या नोकरीची संधी आहे. ती म्हणजे छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि राजीव गांधी मेडिकल कॉलेज अंतर्गहत अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी (Medical officer) या पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Disha Salian Case प्रकरणी पुतण्याबाबत काकूचं मोठं वक्तव्य; शर्मिला ठाकरे म्हणाल्या… 

यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र अशा उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. ठाणे नगरपालिका भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा आणि मुलाखतीची तारीख या बद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ.

पोस्टचे नाव – अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी

एकूण जागा – 25

नोकरीचे ठिकाण – ठाणे

निवड प्रक्रिया – मुलाखत द्वारे.

मुलाखत पत्ता –
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे हाऊस, स्थायी समिती हॉल, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

मुंबईतील खवय्यामुळे ‘स्विगी’ मालामाल : एकाच पत्त्यावर तब्बल 42 लाखांच्या फूड ऑर्डरची डिलिव्हरी 

शैक्षणिक पात्रता –
अधिव्याख्याता पदासाठी-
एमबीबीएस
संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी. (एमडी/एमएस/डीएनबी)
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी) मान्यताप्राप्त शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक शासन संस्था/ खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाकडील सिनिअर रेसिडन्ट किंवा समकक्ष कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी –
एमबीबीएस
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयो किंवा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदकडील नोंदणी असावी.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

पगार-
अधिव्याख्याता- 1 लाख 50 हजार रुपये
वैद्यकीय अधिकारी – 75 हजार रुपये

मुलाखत तारीख -22 डिसेंबर.

अधिकृत संकेतस्थळ –
https://thanecity.gov.in/

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1yviSqm-q6VOqmOo2YI_XwCEXJjgT0UvO/view

मुलाखत प्रक्रिया: ही भरती थेट मुलाखतीच्या मार्गाने केली जाणार आहे. 22 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखती सुरू होतील. मुलाखतीला येतांना उमेदवाराने अधिसूचना काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. याव्यतिरिक्त, सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक कागदपत्रे मुलाखतीला येतांना सोबत आणावी.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube