Download App

ट्रिपल इंजिन सरकारचा वेग मराठवाड्यातच का मंदावतो?, अशोक चव्हाणांचा सवाल…

Mansoon Session : ट्रिपल इंजिन सरकारचा वेग मराठवाड्यातच का मंदावत असल्याचा सवाल काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जात आहे. विविध मुद्यांवर भाष्य करीत अशोक चव्हाण विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत.

https://letsupp.com/maharashtra#google_vignette

चव्हाण म्हणाले, राज्य सरकार चालवण्यासाठी ट्रिपल इंजिन सरकार आहे. हिरवी झेंडी दाखवण्यासाठी गार्डच्या रुात मराठवाड्याचेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आहेत. तरीही मराठवाड्यातच ट्रिपल इंजिन सरकारचा वेग का मंदावतो? असा खोचक सवाल चव्हाण यांनी केला आहे.

राज्यातील रेल्वे प्रकल्पाबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पांना प्राधान्य देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर मात्र, अजूनही प्रकल्पाचा साधा प्रस्तावदेखील केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला नसल्याने अशोक चव्हाणांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

जो जास्त विरोध करेल त्यालाच.., निधी वाटपावर जयंत पाटलांची टीका

दरम्यान, लातूर-नांदेड रेल्वे मार्ग हा मराठवाड्यातील प्रमुख शहरे लातूर व नांदेडला रेल्वे मार्गाने थेट जोडण्यासाठीचा प्रकल्प असून या रेल्वे प्रकल्पाची लांबी 91.3 किमी इतकी आहे. या प्रकल्पाला विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळाकडून मंजुरीही देण्यात आली आहे. हा प्रकल्प एकूण अंदाजे 3 हजार 12 कोटींचा आहे.

यावेळी विधानसभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरही भाष्य केलं आहे. औरंगाबादचे विभागीय आयुक्तांच्या शिफारशीनूसार शेतकऱ्यांना 10 हजार रुपये देण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांबाबत सरकारचे धोरण ‘जखम गुडघ्याला अन् पट्टी डोक्याला’ अशा पद्धतीचे आहे.

शेतकरी सन्मान योजनेत दर चार महिन्यांनी दोन हजार रूपये अनुदान देण्याऐवजी खरीप व रब्बी हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा झाली तर त्यांना पेरणीपूर्व मशागत आणि पेरणीच्या खर्चासाठी मदत होऊ शकणार असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us